Hot Posts

6/recent/ticker-posts

शेतकरी क्रांती सेना या संघटनेची स्थापना

 शेतकरी क्रांती सेना या संघटनेची स्थापना  




अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- रविवारी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अक्कलकोट येथे शेतकरी क्रांती सेना या संघटनेची स्थापना करण्यात आली.
तालुक्यासह सोलापूर जिल्ह्या व महाराष्ट्रातील शेतकऱ्यावरती खूप अन्याय होत आहे. शेतकऱ्यांच्या साठी लढा लढण्यासाठी राजकीय पक्ष विरहित शेतकऱ्यांच्या जीवनात चांगले दिवस आणण्यासाठी  शेतकरी क्रांती सेनेची स्थापना करत आहोत अशी माहिती शेतकरी सेनेचे प्रमुख आनंद बुक्कानुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रामुख्याने अक्कलकोट तालुक्यातील सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जीवन मान उंचवण्यासाठी,  पिक विमा, हमीभाव,  शेतीसाठी पाणी  खत व्यवस्थापन, ऊसदार  तलाव जोडो,  सह शेतकऱ्याच्या प्रत्येक  कामासाठी  संघर्ष करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे.  शेतकऱ्याच्या मुलांच्या शिक्षणाचे जीवन उंचावणे,  उत्पादनासाठी शेतकऱ्यांना ट्रेनिंग  देणे, गट शेती करून शेतकऱ्यांचा खर्च कमी करणे , शेतकऱ्याच्या  पीक  निर्याती सह  सर्व शेती संबंधित निगडित  विषयासाठी व्यापक काम करण्यासाठी  शेतकरी क्रांती सेनेची  स्थापना केली आहे.  अक्कलकोट तालुक्यातील व सोलापूर जिल्ह्यातील   शेतकऱ्यांच्या कुठलीही समस्या सोडवण्यासाठी शेतकरी क्रांती सेनेशी संपर्क करावा, आपल्या प्रत्येक कामात शेतकरी  क्रांती सेना मदत करण्याचा विश्वास शेतकरी सेना प्रमुख म्हणून देतो असे आनंद बुक्कानुरे म्हणाले.  या वेळी  शेतकरी सेनेचे पदाधिकारी  शरण  सुरवसे, महांतेश हत्तुरे, मल्लिनाथ अरवतकल, राम जाधव, मोहम्मद पठाण,  श्रीशैल  स्वामी, गुरुनीगप्पा आप्पा पाटील, शांतिवीर कळसगोंडा,  स्वामीनाथ प्रचंडे, बसवराज पुजारी, जितू  अनंतपुरे, संतोष पाटील, चंद्रकांत कुंभार,  सिद्धाराम बिराजदार, मल्लू कल्याण, उमेश साळुंखे, मृगेंद्र मुदेनकेरी, अफसर मकानदार,श्रीशैल दानशेट्टी, हनुमंत नागोरे,  रफिक मुजावर, बिरू माळगे,  कृष्ण राजपूत,  भीमा भासगी, आदित्य हिबारे, संजय अरवतकल, सुनील धर्मसाले,  नागू शिंदे,आदी उपस्थित होते. लवकरच शेतकरी क्रांती सेनेचे  सर्व कार्यकारणी घोषित करण्यात येईल. मोठ्या प्रमाणात पदाधिकारी उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments