एकता महिला मंचच्या आरोग्य शिबिरात 225 महिलांची,मुलींची आरोग्याची तपासणी
बार्शी (कटूसत्य वृत्त):- "एकता "महिला मंच यांच्यावतीने महिलांसाठी व मुलींसाठी घेण्यात आलेल्या आरोग्य शिबीरात एकूण 225महिला व मुलींची आरोग्य तपासणी आज दिनांक 02 मार्च 2025 रोजी सर्जापूर ता. बार्शी येथे करण्यात आली.
प्रारंभी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे उपस्थित डॉक्टर व महिला मान्यवरयांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार व सन्मान एकता महिला मंचच्या वतीने करण्यात आला. यावेळी डॉ अशोक अनपट, डॉ वर्षा कुंभार, डॉ स्वप्नाली गंगावणे, डॉ स्वादिका देशमुख,डॉ.सपना मलमे, डॉ कोमल जामदार,डॉ महेश पवार, डॉ केदार महाडिक, डॉ केवटे यांनी विविध आजारावर माहिती देत महिलांना व मुलींना मार्गदर्शन केले तसेच साई होमिओपॅथी कॉलेज अँड हॉस्पिटल वैराग याविषयी सविस्तर माहिती दिली . या आरोग्य शिबिरामध्ये महिलांचे मासिक पाळी, सांधेदुःखी, गुडघेदुखी,संधिवात ,आमवत ,रक्तदाब मधुमेह , बीपी शुगर, तसेच महिलांचे वेगवेगळे आजार यावरती तपासणी करण्यात आली यामध्ये महिला व मुलींची एकूण 225 तपासणी करण्यात आली .यावेळी उपस्थित मुलींनी डॉ स्वप्ननाली गंगावणे यांनी मार्गदर्शन केले यावेळी उपस्थित एकता महिला मंचचे प्रभाकर क्षीरसागर, तसेच एकता महिला मंचच्या सर्जापूर येथील प्रमुख जयश्री कांबळे, अश्विनी डोळसे, फरजना पठाण,सुरेखा कांबळे, सुनीता कांबळे, शांता कांबळे,वनमाला कांबळे,कस्तुरा डोळसे, रतन देवकर प्रभावती डोळसे इत्यादी सदस्य व गावातील अन्य महिला तसेच मुली मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होत्या सदस्या व गावातील अन्य महिला व आश्रम शाळा सर्जापूर येथील मुली यावेळी मोठया संख्येने उपस्थित होत्या तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री कांबळे यांनी केले व आभार कस्तुरा कांबळे यांनी मानले.
0 Comments