तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात मंदिराच्या पुजाऱ्यांचा सहभाग; 13 पुजाऱ्यांची नावे आली समोर
तुळजापुर (कटूसत्य वृत्त):- तुळजापुरातून एका आरोपीच्या हॉटेलमधून हे ड्रग्ज वितरित केल जात असल्याची माहिती समोर आली आहे. तुळजापुरात वितरित केलं जात असलेलं ड्रग्ज क्रिस्टल फॉरमॅटमध्ये असल्याची माहिती आहे. अगोदर मौज म्हणून आरोपींनी ड्रग्ज घेतलं, त्यानंतर तुळजापुरात ड्रग्ज व्यापार सुरू झाला आहे
पिंटू मुळेचा तुळजापुरात ड्रग्जबाबत पहिल्यांदा संबंध आला तो चंद्रकांत उर्फ बापू कने यांच्याशी. बापू कने यांच्या संपर्कातील इतर आरोपी ड्रग्ज प्रकरणात जोडले गेले होते. मुंबईतून पाच ग्रॅम वजनाच्या पुड्यांमध्ये ड्रग्ज तुळजापुरात येत होते. तुळजापुरात एका पुढीच्या अडीच ग्रॅम वजनाच्या दोन पुड्यांमध्ये त्याची विभागणी केली जायची, त्यानंतर ते वितरित केले जायचं. तुळजापुरात एक ग्राम ड्रग्जची किंमत अंदाजे 3000 असल्याची माहिती देण्यात आली आहे.
या प्रकरणात गेल्या दोन महिन्यांपासून मोठ्या कारवाया होत आहेत. ड्रग्ज प्रकरणात काही दिवसांपूर्वी राजकीय कनेक्शनही समोर आले होते. या प्रकरणात तुळजाभवानी मंदिरातील तब्बल 13 पूजाऱ्यांचा ड्रग्ज तस्करीशी संबंध असल्याचे उघड झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. तुळजापूर ड्रग प्रकरणात बहुतांश पुजारी पेडलर असल्याची सूत्रांची माहिती आहे. मंदिर प्रशासनाने या आरोपी पुजाऱ्यांची यादी पोलिसांकडून मागवली आहे. पुजारी मंडळाने मात्र सरसकट पुजाऱ्यांची बदनामी थांबवण्याचे आवाहन केले आहे.
संगीता गोळे या मुख्य आरोपी आहेत. संगीता गोळेचे पती वैभव गोळे आणि ड्रग्स प्रकरणातील आरोपी पिंटू मुळे यांची मुंबईत ओळख झाली होती. या ओळखीतून ड्रग्जची देवाणघेवाण झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पिंटू मुळे याच्या ड्रग्जमुळं मुंबईतील चकरा वाढल्या होत्या असेही पोलिस म्हणाले.
0 Comments