Hot Posts

6/recent/ticker-posts

चैनीसाठी दुचाकी चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पोलिसांनी लावला छडा तिघांना अटक, 10 गुन्हे उघडकीस

 चैनीसाठी दुचाकी चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीचा 

पोलिसांनी लावला छडा तिघांना अटक, 10 गुन्हे उघडकीस

इचलकरंजी (कटूसत्य वृत्त):-कोल्हापूर स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने  चैनीसाठी दुचाकी चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीचा छडा लावला. याप्रकरणी तिघांना अटक करून १० गुन्हे उघडकीस आणत १५ मोटारसायकली असा एकूण आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगार अक्षय राजू शेलार (२४, रा. इचलकरंजी), विनायक बाळू गवळी (२२, रा. शाहूनगर, कागल), चंद्रदीप कुलदीप गाडेकर (२३, रा. संत रोहिदास चौक, कागल) अशी त्यांची नावे आहेत. कागल एसटी डेपो परिसरात सापळा रचून तिघांना अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकामार्फत मोटारसायकल चोरीच्या गुन्हयांचा समांतर तपास सुरू होता. पोलिस अंमलदार सागर चौगले यांना संशयित तिघेजण कागल एसटी डेपो येथे चोरीच्या मोटारसायकली विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्याअनुषंगाने पोलिस उपनिरीक्षक जालिंदर  चे पथकाने सापळा रचूजाधव व त्यांन अक्षय शेलार, विनायक गवळी, चंद्रदीप गाडेकर यांना ताब्यात घेतले.

यावेळी त्यांच्याकडून कागल, शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेल्या दोन मोटारसायकलींसह गुन्हयात वापरण्यात आलेली एक मोटारसायकलही जप्त करण्यात आली. त्यानंतर तिघांची कसून चौकशी करण्यात आली. यावेळी तिघांनी शिवाजीनगर हद्दीत तीन, कागलमध्ये दोन तर गोकुळ शिरगाव, इस्पुर्ली, कुरुंदवाड तसेच कर्नाटक राज्यातील निपाणी, बसवेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एक असे १० ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर आणखी १२ मोटारसायकली जप्त केल्या. संशयित व वाहनांचा ताबा शिवाजीनगर पोलिस ठाण्याकडे देण्यात आलेला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर, उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्यासह सागर चौगले, आदींच्या पथकाने कारवाई केली

Reactions

Post a Comment

0 Comments