होलार समाज संघटना माळशिरस तालुकाध्यक्षपदी शिवाजीराव होनमाने - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, March 13, 2025

होलार समाज संघटना माळशिरस तालुकाध्यक्षपदी शिवाजीराव होनमाने

 होलार समाज संघटना माळशिरस तालुकाध्यक्षपदी शिवाजीराव होनमाने




नातेपुते (कटूसत्य वृत्त):- अखिल भारतीय होलार समाज संघटना माळशिरस तालुक्याच्या वतीने शासकीय विश्रामगृह माळशिरस या ठिकाणी शिवाजीराव होनमाने यांची सर्वांनुमते तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली.सदरची बैठक प्रमुख मार्गदर्शक नंदकुमार केंगार,महाराष्ट्र राज्याचे सचिव मधुकर भंडगे, बैठकीचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष मुन्ना केंगार,राज्य उपाध्यक्ष सुनील ढोबळे,जिल्हा सचिव तुकाराम पारसे,यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाली. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या निवडी संपन्न झाल्या.प्रथमतः सर्वांनी आपले ओळख सांगितली. संघटना वाढीसाठी कशा पद्धतीने प्रयत्न केले पाहिजे. गाव तेथे शाखा झाली पाहिजे. या संदर्भात राष्ट्रीय नेते नंदकुमार केंगार यांनी मार्गदर्शन केले.तसेच पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी तुकाराम करडे,जिल्हा उपाध्यक्षपदी बाळासाहेब पारसे,जिल्हा चिटणीसपदी दिनेश जावीर,ज्येष्ठ मार्गदर्शकपदी ब्रह्मदेव केंगार, तालुका उपाध्यक्षपदी तुकाराम कांबळे यांच्याही निवडी संपन्न झाल्या.या बैठकीस पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख बाजीराव केंगार,लालासो गेजगे,महादेव केंगार,उत्तरेश्वर पारसे,मधुकर ढोबळे,पंढरी पारसे,विकास केंगार,रणजीत नामदास, सागर जगदाळे, प्रीतम माने आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages