Hot Posts

6/recent/ticker-posts

पृथ्वीराज सावंत यांच्या सन्मानार्थ विविध सामाजिक उपक्रम -गरिब महिलांना साडी वाटप

 पृथ्वीराज  सावंत यांच्या सन्मानार्थ विविध सामाजिक उपक्रम -गरिब महिलांना साडी वाटप 





माढा (कटूसत्य वृत्त):-भैरवनाथ शुगर आलेगाव चे कार्यकारी संचालक,तथा राजवी उद्योग समुहाचे चेअरमन पृथ्वीराज शिवाजीराव सावंत यांच्या सन्मानार्थ विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.


शिवसेनेचे नगरसेवक अरविंद खरात यांच्या वतीने माढ्यातील पारधी समाजातील गरजू महिलांना साड्या व कपड्याचे  वाटप करण्यात आले.तसेच पृथ्वीराज सावंत मित्र परिवाराच्या वतीने केवड मधील  आश्रमशाळेतील सर्व मुला मुलींना अन्नदान करण्यात आले.

 माढा नगरपंचायतीचे शिवसेना शिंदे गटाचे  नगरसेवक अरविंद खरात यांनी हा सामाजिक उपक्रम राबविला. 
माढा शहरातील क्रिडा संकुल परिसरात राहणाऱ्या पारधी समाजातील महिलांना साड्या तर लहान मुलांना कपडे खाऊचे वाटप करण्यात आले.तसेच केवड मधील  आश्रमशाळेत गोरगरिब निवासी विद्यार्थ्याना भोजन देण्यात आले.यावेळी वाकावचे सरपंच ऋतुराज सावंत,मुन्ना साठे,नगरसेवक अरविंद खरात, अजिंक्य काटे,विक्रम कदम,प्रविण चवरे,राजाभाऊ लवटे,
 सौदागर भांगे, गणेश चव्हाण, अमोल गायकवाड, नागेश थोरात,ओंकार भांगे,पप्पू खेडकर,व्यवस्थापक कालिदास चव्हाण,ग्रामसेवक संदीप सावंत शाळेतील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments