वैराग नगरपंचायतीच्या सभापतीपदी भूमकरसह,
वाघ, मोहिते, बागवान यांच्या निवडी
वैराग (कटूसत्य वृत्त):- बार्शी तालुक्यातील वैराग नगरपंचायतीच्या सार्वजनिक बांधकाम, नियोजन विकास समिती सभापती आणि उपनगराध्यक्षपदी निरंजन भुमकर यांची फेरनिवड करण्यात आली. तसेच विषय समिती सभापतींच्या निवडीही करण्यात आल्या आहेत. विषय समिती सभापती आणि स्थायी समिती गठित करण्याची प्रक्रिया बार्शीचे तहसीलदार एफ.आर.शेख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यामध्ये जैतूनबी गफूर बागवान यांची महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी निवड करण्यात आली. नागनाथ वाघ आणि अतुल मोहिते यांच्यावर पुन्हा विश्वास टाकत आरोग्य व पाणीपुरवठा सभापती पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
वैराग नगरपंचायतीच्या पहिल्याच पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते निरंजन भूमकर यांनी आपले निर्विवाद वर्चस्व निर्माण करीत १७ पैकी १३ जागा मिळवल्या. आरक्षित असलेल्या नगराध्यक्ष निरंजन भूमकर नागनाथ वाघ पदावर भुमकर गटाच्या सुजाता संगमेश्वर डोळसे यांची निवड करण्यात आली. तर स्वतः निरंजन भूमकर हे उपनगराध्यक्ष बनले आहेत. त्यानंतर नगरपंचायतीमध्ये दरवर्षी एका वर्षासाठी विषय समिती सभापतींची निवड केली जात आहे. हे वर्ष पूर्ण होताच विषय समिती सभापती आणि स्थायी समिती गठीत करण्याची प्रक्रिया नव्याने पार पाडण्यात आली.यावेळी उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर यांची सार्वजनिक बांधकाम, नियोजन आणि विकास समितीच्या सभापती पदी निवड कायम ठेवण्यात आली. या समितीमध्ये सदस्य म्हणून नगरसेवक नागनाथ वाघ, अजय काळोखे, जैतूनबी बागवान आणि अतुल मोहिते जैतूनबी बागवान शाहूराजे निंबाळकर यांचा समावेश आहे. महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापतीपदी जैतूनबी गफूर बागवान यांची निवड करण्यात आली.या समितीमध्ये तृप्ती निरंजन भूमकर, जयश्री खंडेराया घोडके,गुरुबाई संजय झाडमुखे आणि अर्चना बाबासाहेब रेड्डी यांचा समावेश आहे. तर सार्वजनिकआरोग्य आणि दिवाबत्ती समितीच्या सभापतीपदी नागनाथ नामदेव वाघ यांची निवड करण्यात आली.
या समितीमध्ये अतुल अशोक मोहिते, तृप्ती निरंजन भूमकर,अजयकुमार शिवाजी काळोखे, अर्चना बाबासाहेब माने रेड्डी यांचा समावेश आहे. तर पाणीपुरवठा आणि जल निस्सारण समितीच्या सभापतीपदी अतुल अशोक मोहिते यांची पुन्हा निवड करण्यात आली.या समितीमध्ये नागनाथ नामदेव वाघ, अक्षय विठ्ठल ताटे, गुरुबाई संजय झाडमुखे, श्रीशैल्य मच्छिंद्र भालशंकर यांचा समावेश आहे. तर स्थायी समितीच्या पदसिद्ध सभापती सुजाता संगमेश्वर डोळसे या असून सदस्य म्हणून निरंजन प्रकाश भूमकर,आसमानय्युम मिर्झा, अक्षय विठ्ठल ताटे, पद्मिनी आप्पाराव सुरवसे या नगरसेवकांचा समावेश करण्यात आला आहे.यावेळी प्रभारी मुख्याधिकारी चरण कोल्हे, नायब तहसीलदार रवींद्र सानप, मंडल अधिकारी एन. डी. लांडगे, ग्राम महसूल अधिकारी एम. एम. जाधव यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण वाघमारे यांनी केले तर आभार सचिन पानबुडे यांनी मानले.

0 Comments