Hot Posts

6/recent/ticker-posts

उजनीनगर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

 उजनीनगर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप 




टेंभुर्णी  (कटूसत्य वृत्त):- साक्षी राजदीप मस्के व राजदीप अनिल मस्के या अनिवासी भारतीय नवदाम्पत्याने उजनीनगर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना कंपास बॉक्स,कलर शिसपेन्सिल या शालेय साहित्याचे वाटप केले.

साक्षी व राजदीप मस्के यांचा नुकताच विवाह संपन्न झाला होता.हे दाम्पत्य अनिवासी भारतीय रहिवाशी असुन ते कॅनडामध्ये नौकरी करीत आहेत.साक्षी या कॅनडा या देशात बँक ऑफ मोंट्रेयलमध्ये मॅनेजर पदावर तर राजदीप मस्के हेही याच देशात जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीत मॅनेजर आहेत.साक्षी यांना विवाह प्रित्यर्थ येथील विद्यार्थाना काहीतरी गिफ्ट द्यावयाचे होते.यामुळे त्यांनी टेंभुर्णी शहरातील उजनीनगर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य भेट दिले.
यावेळी साक्षी यांनी सर्वांवर प्रेम करा.सर्वांचा आदर करा.स्वतःच्या पायावर उभे राहा व नंतर सर्वांना मदत करा असा विद्यार्थ्यांना संदेश दिला.

शिक्षक संजय लांडगे यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख करून दिली.यावेळी उद्योजक नागेश बोबडे,टेंभुर्णी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा स्वराली बोबडे,विनोद शिंदे,नागेश कल्याणी,शिक्षक महादेव राखुंडे,रेखा बोबडे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जॉकी सुर्वे,उपाध्यक्ष जयप्रकाश ननवरे हे उपस्थित होते.या उपक्रमाचे शिक्षक व विद्यार्थी यांनी कौतुक केले.
Reactions

Post a Comment

0 Comments