Hot Posts

6/recent/ticker-posts

पेट्रोल-डिझेलच्या पाईपलाईनला लागली आग

 पेट्रोल-डिझेलच्या पाईपलाईनला लागली आग




हिंदुस्तान पेट्रोलियमचा मॉक ड्रिल

कुरुल (कटूसत्य वृत्त):- हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड अर्थात एच पी सी एल पाकणी येथे पेट्रोल डिझेल सप्लाय करणाऱ्या मोठ्या पाईपलाईनला अंकोली येथील चॅनेज क्रमांक 490.7 च्या शिवारात दुर्घटना होऊन ती फुटली आहे आणि त्या ठिकाणी आग लागली आहे. ही बातमी वाऱ्यासारखी गावामध्ये पसरली. आणि नागरिकांमध्ये एकच घबराट उडाली. दुर्घटनेच्या ठिकाणी कंपनीचे कर्मचारी, फायर ब्रिगेडचे फायरमॅन, आरोग्य केंद्राचे कर्मचारी, पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी धावपळ करून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत होते. तर कोणी जखमींना वाचवण्यासाठी धावपळ करत होते. मात्र हिंदुस्तान पेट्रोलियम इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम यांची संयुक्त मॉक ड्रिल अर्थात सराव चाचणी असल्याचे सांगण्यात आले आणि येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूसहित गावकऱ्यांनी एकच निःश्वास सोडला.

मुंबई-पुणे व सोलापूर जिल्ह्यात एचपीसीएलची पाईपलाईन पाकणी डेपो पर्यंत आली आहे. पाईपलाईन मधून 50 किलो दाबाने भारत पेट्रोलियम इंडियन पेट्रोलियम व हिंदुस्थान पेट्रोलियम या तिन्ही ठिकाणी डिझेल आणि पेट्रोल पुरवठा करते .दरम्यान आज अंकोली शिवारात आपत्कालीन परिस्थितीत कशाप्रकारे यंत्रणा हाताळायची यासाठी हिंदुस्तान पेट्रोलियम चे वरिष्ठ मॅनेजर जहांगीर नदाफ, असिस्टंट मॅनेजर अमित गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली मॉक ड्रिल घेण्यात आले. मॉक ड्रिल यशस्वी करण्यासाठी लाईन वॉकर्स सुपरवायझर इलेक्ट्रिशन ऑपरेटर व कंट्रोल रूमचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यासहित सर्वांनी परिश्रम घेतले.यावेळी ऑफिसर हेमंत जयस्वार, अशोक मेंटा,सेफ्टी मॅनेजर संदीप वीर, उपमहाव्यवस्थापक समीर ताम्हाणे, शहाजी देवडे, रोहन येडगे, डीडीएमओ शक्ती सागर घुले आदी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments