नातेपुते (कटूसत्य वृत्त):- स्त्री शिक्षणाचे द्वारे महिलांसाठी खुल्या करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून नातेपुते येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालयामध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.रज्जाक शेख व प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ प्रा.सुहास नलावडे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून महाविद्यालयाच्या वतीने सर्व महिला प्राध्यापिकाचा महिला दिनानिमित्त पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी बोलत असताना प्राचार्य डॉ.रज्जाक शेख म्हणाले की,स्त्री शक्ती हे संस्काराचे केंद्र आहे. त्यामुळे समाज घडविण्यात स्त्रियांचे योगदान अतिशय मोलाचे आहे. प्रत्येक मुलीने व महिलेने स्वयंपूर्ण व स्वावलंबी होणे गरजेचे असल्याचे मत
प्राचार्य डॉ.रज्जाक शेख यांनी व्यक्त केले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.रब्बाना शेख यांनी केले असुन सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापिका संपुष्टे यांनी केले तर आभार डॉ. कमल कांबळे यांनी मानले.कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापिका भोईटे सुषमा, वाघ नलिनी, झंजे प्रियांका, वाघमोडे राधिका ,भोसले वर्षाराणी ,वाघमोडे राधिका, कुबडे तनुजा, रासलकर दिपाली, मंगल पवार, अश्विनी वाघमोडे , प्राजक्ता ठोंबरे, संध्या कोकाटे दिपाली पोपळभट, कोकाटे संध्या, मोरे इंद्रायणी, साळुंखे हर्षल ,मसुगडे दीपिका यांचे सहकार्य लाभले. सहकार्य लाभले असून कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी हसन मोगल, वाघमोडे बापूराव. तसेच नागराज कर्पे ,नितीन जगताप,शिक्षकेतर कर्मचारी सुधाकर काळे, जावीर विलास यांनी विशेष परिश्रम घेतले.
0 Comments