Hot Posts

6/recent/ticker-posts

फडणविसांचे ऐकूनच राणे बोलतात संभाजी ब्रिगेड-महासचिव सौरभ खेडेकर-

 फडणविसांचे ऐकूनच राणे बोलतात 

संभाजी ब्रिगेड महासचिव सौरभ खेडेकर


माढा (कटुसत्य वृत्त):- नितेश राणे कुणाकडून स्रिक्पट घेऊन बोलतात.हे वेगळं सांगायची गरज नाही.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ऐकूनच नितेश राणे बोलतात. केवळ सत्तेसाठीच ही  लोक लाचार झाली आहेत.किल्ले रायगडावर असलेली वाघ्या कुत्र्याची समाधी काढली पाहीजे.छत्रपती  संभाजी महाराजाच्या भुमिकेसोबत संभाजी ब्रिगेड आहे.औरंगजेबाची महाराजाच्या शौर्याचं प्रतिक आहे.कबर काढून इतिहास पुसण्याचे काम सरकारने करु नये अशी ठोस भुमिका संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांनी मांडली.

माढ्यात जिजाऊ रथ यात्रेचे आगमन झाल्यानंतर उपस्थितांना मार्दर्शनपर बोलत होते.

माढा शहरात जिजाऊ रथयात्रेने प्रवेश करताच सह्याद्री उद्योग समुहाच्या व सकल मराठा समाजातील महिला च्या उपस्थितीत जंगी स्वागत करण्यात आले.फटाक्यांची आतषबाजी,हालगीचा निनाद आणी जय जिजाऊ चा जयघोषाने शिवमय वातावरण झाले होते.संभाजी ब्रिगडेचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दिनेश जगदाळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात रथयात्रेचे स्वागत केले.प्रा.शिवाजीराव सावंत यांनी संपर्क कार्यालयासमोर जिजाऊंना अभिवादन करीत लाडू वाटप करुन रथयात्रेचे फटाक्याच्या आतषबाजीत स्वागत केले.यावेळी सरपंच ऋतुराज सावंत,पृथ्वीराज सावंत,मुन्ना साठे,अरविंद खरात आदी उपस्थित होते.लोकमंगल पतसंस्थेच्या वतीने नगरसेवक शहाजी साठे  यांनी स्वागत केले.

पुढे बोलताना सौरभ खेडेकर म्हणाले,महाराष्ट्रात सध्या दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून सामाजिक तेढ वाढवण्याचे काम प्रतिगामी यंत्रणाकडून चालवले जात आहे.प्रतिगामी शक्तीचे विचार  महाराष्ट्रात बळकट केले जात आहेत.छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज,ताराराणी यांच्या शौर्याचं प्रतिक ही औरंगजेबाची कबर असून कबर उध्वस्त करुन इतिहास पुसण्याचे प्रयत्न सुरु आहेत.पुन्हा एकदा दंगल घडवून भावना पेटवून महाराष्ट्र अशांत ठेवण्याचे कारस्थान आहे.यामधुन शेतकरी,बेरोजगारी  असे प्रश्न बाजूला ठेवले जात आहेत.मराठा आरक्षण ओबिसीतुन मिळणे शक्य आहे.ही मागणी मराठा सेवा संघाची १९९० पासूनची आहे.परंतू आता मराठा आरक्षञ सामाजिक नव्हे तर राजकीय प्रश्न झाला आहे.मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन सरकारने फसवणूक  केली आहे.आरक्षणाचा प्रश्न कधी सुटेल सांगणे कठीण आहे.नारायण राणे  व नितेश राणे काॅग्रेस मध्ये असतानाची भाषणे ऐकली तर केवळ सत्तेसाठी ही लोकं लाचार झाली आहेत.वाघ्या कुत्र्याची किल्ले रायगड वरील समाधी काढली पाहीजे.यासाठी मसेसचा कार्यकर्ता महेश चव्हाण महेश चव्हाण यांनी हा कुत्रा दरीत फेकुन दिला होता.तो पुन्हा बसवला आहे.छत्रपती संभाजी महाराजांनी ही पुतळा काढण्याची मागणी केलीय.संभाजी ब्रिगेड चा त्याच्या मागणीला पाठिंबा आहे.यावेळी अर्जुन तनपुरे, सचिन जगताप,दिनेश जगदाळे,दत्ताजी शिंदे, निलेश देशमुख,शहाजी साठे,जिजाऊ ब्रिगेडच्या शारदा शिंदे, लता जगदाळे,अॅड.रत्नप्रभा जगदाळे,धनश्री शिंदे,मोहिनी कोल्हे,प्रभावती घाडगे,अंजली जगदाळे,शुभांगी मस्के,शांता जगदाळे,पुनम माने,सुप्रिया कदम, आदी सह मराठा समाज बांधव महिला उपस्थित होत्या.रथयात्रेत शालेय विद्यार्थ्यानी विविध वेशभुषेत सहभाग नोंदवला.

Reactions

Post a Comment

0 Comments