शेतीची औजारं, रासायनिक खतं, कीटकनाशकं, यांच्यासह शेतीसाठीच्या आवश्यक वस्तूंवरचा जीएसटी कर रद्द करावा- खा. प्रणिती शिंदे
नवी दिल्ली, (वृत्त सेवा):- सोलापूर लोकसभेच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी संसद अधिवेशनात शेतकऱ्यांचे प्रश्न आक्रमक पणे मांडले यावेळी बोलताना म्हणाले की, महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत आहे. अन्न नागरी पुरवठा मंत्र्यांनी राजीनामा दिला, कृषी मंत्र्यावर आरोप आहेत, आणि शेतकरी त्रस्त आहे. उसाला दर मिळत नाही. उसाच्या रिकव्हरीचे दर ठरले आहेत परंतु कारखानदारांनी पंधरा दिवसात पैसे दिले पाहिजेत. दुधाला दर मिळाला पाहिजे. शेतीमालाला हमीभाव मिळाला पाहिजे. शेतीची औजारं, रासायनिक खतं, कीटकनाशकं, यांच्यासह शेतीसाठीच्या आवश्यक वस्तूंवरचा जीएसटी कर रद्द करावा. पी एम किसान योजनेची मदतीची रक्कम वाढविली पाहिजे. शेतकऱ्यांच्या सिबिल स्कोअर रद्द करून कर्ज पुरवठा केला पाहिजे. द्राक्ष बागायतदारांना प्रलंबित अनुदान आणि मदत दिली पाहिजे. फळबागांची सिंचन योजनेची सबसिडी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे अश्या महत्वपूर्ण मागण्या संसदेत केल्या.
0 Comments