उद्योजकांनी सीएसआर फंडातून शहर विकासाला हातभार लावावा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहरातील पर्यावरण संवर्धन, पाणी व इतर विकास कामासंदर्भात सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फंड) विविध कंपन्या, बँक आणि संस्थांनी महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.सचिन ओम्बासे यांनी केले.सामाजिक उत्तरदायित्व निधीतून संबंधित संस्थांनी या अंतर्गत असलेल्या विविध कामांसाठी मदत करावी,याकरिता महापालिकेत बैठक आयोजित केली होती.त्याप्रसंगी ते बोलत होते. या सोलापूर महन्तमालिका बैठकीस अतिरिक्त आयुक्त रवी पवार, उपायुक्त आशिष लोकरे, आयुक्तांचे स्वीय सहायक राहुल कुलकर्णी, सहायक आयुक्त शशिकांत भोसले यांच्यासह विविध कंपन्या, बँका आणि संस्था-संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. दरम्यान पत्रकारांशी बोलताना आयुक्त डॉ. ओम्बासे म्हणाले, संबंधित बैठकीला बँकांचे, विविध कंपन्यांचे आणि संस्था, संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. चांगली चर्चा झाली.सर्वांनी सीएसआर फंडातून आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. सीएसआर फंडातून संबंधित इच्छुकांनी आर्थिक, सेवा व वस्तू स्वरूपात मदत करावी.त्यासाठी प्रस्ताव महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त किंवा आयुक्त यांच्याकडे सादर करावेत, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.ओम्बासे यांनी केले आहे.
0 Comments