अनगर येथे जिजाऊ रथयात्रेचे उत्साहात स्वागत
मोहोळ(कटूसत्य वृत्त):- सर्व जाती धर्माच्या भिंती विसरून मानवतेच्या धर्माची कीर्ती वाढवण्याच्या
उदात्त हेतूने भोसले गढी वेरुळ ते लाल महाल पुणेकडे निघालेल्या या जिजाऊ रथयात्रा - समाज जोडो अभियानाचे अनगर येथे स्वागत करून या अत्यंत उदात्त आणि स्फूर्तिदायी उपक्रमामध्ये मोहोळचे माजी आमदार तथा महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील आणि लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील यांनी सहभाग घेतला. या रथयात्रेचे मार्गदर्शक सौरभ खेडेकर यांचे स्वागत करून त्यांचा यथोचित सन्मान यावेळी माजी आ. राजन पाटील आणि बाळराजे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अनगर पंचक्रोशीतील त्याचबरोबर मोहोळ तालुक्यातील विविध जाती-धर्माचे समाजबांधव बहुसंख्येने उपस्थित होते. मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या रथयात्रेचे आयोजन संपूर्ण राज्यात केले आहे.या रथयात्रेचे माढा तालुक्यातून मोहोळ तालुक्यात आगमन अनगर येथूनच झाले. मोठ्या उत्साहात सर्व समाजबांधवांनी एकत्रित येऊन राजमाता जिजाऊ यांच्या मूर्तीचे तसेच जिजाऊ रथाचे पूजन सन्मानपूर्वक करण्यात आले. याप्रसंगी प्राध्यापक जी.के. देशमुख, उद्योजक राम कदम, नारायण गुंड, बाळासाहेब पाटील, दत्ता मुळे, वैभव गुंड, गणेश पावले, सोमनाथ शिंदे यांच्यासह विविध समाजबांधव उपस्थित होते.
0 Comments