भक्तांच्या अचूक गणनेसाठी लावणार डिजिटल यंत्र
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- तीर्थक्षेत्र अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी दररोज वाढत चाललेली गर्दी पाहता येणाऱ्या भक्तांची संख्या ही अंदाजित ठरविली जात आहे. मुख्याधिकारी तथा प्रशासक रमाकांत डाके यांनी सी.सी.टी.व्ही.व डिजीटल यंत्रणेच्या माध्यमातून गणना होण्यासाठीनुकतीच या प्रक्रियेची निविदा काढली आहे.सध्या श्री क्षेत्र अक्कलकोट नगरपरिषदेवर प्रशासक राज असून या काळात बरीच विकासाची कामे मार्गी लागत आहेत. आ. सचिन कल्याणशेट्टी हे तीर्थक्षेत्र विकासाचा अनुशेष भरून काढत आहेत, तीर्थक्षेत्र विकास व विविध योजनेच्या माध्यमातून विकास निधीचा ओघ कायम आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रचिती व महिमा हा कलकत्ता ते जम्मू काश्मीरपर्यंत आहे, याबरोबरच परदेशातूनही मोठ्या प्रमाणात भाविक सण, वार, उत्सवाच्या काळात श्री क्षेत्र अक्कलकोटला येतात. येणाऱ्या भाविकांची गणना करण्याचे नगरपरिषदेने ठरविले आहे.यापूर्वी भाविकांची संख्या अंदाजे सांगितली जायची, मात्र आता अचूक गणना होण्याकामी सी.सी.टी.व्ही., डिजिटल यंत्राचा वापर करण्यात येणार आहे.
चौकट
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या
दर्शनासाठी दररोजची गर्दी होत
आहेच, याबरोबरच सण, वार, उत्सवाच्या
काळात होणारी गर्दी ही लक्षणीय आहे.
आजवर ही गणना अंदाजित केली जायची,
राज्यातील टॉप ५ मध्ये असलेले तीर्थक्षेत्र
अक्कलकोट हे विविध विकासकामांच्या
माध्यमातून कात टाकत आहे. असे असताना
तरंगती लोकसंख्येचा अभ्यास होणे गरजेचे
आहे. अंदाजपंचे भाविक गणना नको,
याकरिता सी.सी.टी.व्ही., डिजिटल यंत्रणेच्या
माध्यमातून परफेक्ट भक्तांची गणना करण्याचा
निर्णय नगरपरिषदेने घेतला आहे. याबाबतची
निविदा काढण्यात आली असून लवकरच
कामास प्रारंभ करण्यात येणार आहे.
- रमाकांत डाके, मुख्याधिकारी
0 Comments