Hot Posts

6/recent/ticker-posts

अभिनव स्कूल मध्ये विद्यार्थ्यांचा आनंदी बाजार व महिलांसाठी होम मिनिस्टर खेळ रंगला

 अभिनव स्कूल मध्ये विद्यार्थ्यांचा आनंदी बाजार व महिलांसाठी होम मिनिस्टर खेळ रंगला




वाशिंबे (कटूसत्य वृत्त):- अभिनव पब्लिक स्कूल वाशिंबे ता.करमाळा या प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांचे व्यवहारिक ज्ञान वाढावे तसेच त्यांना विविध व्यवसायांची ओळख व्हावी या उद्देशाने विद्यार्थ्यांचा आनंदी बाजार आयोजित केलेल्या या बाजारामध्ये  आर्थिक चलनाचया उलाढालीतून व्यवहारीक ज्ञान मिळते  या उद्देशाने हा उपक्रम प्रशालेत राबविण्यात आला.विद्यार्थ्यांनी अगदी भाजीपाला पासून ते हॉटेलचे गोड खाण्याचे पदार्थ असे विविध प्रकारचे स्टॉल उभे करून आपले कौशल्य त्यात दाखवून दिले.
 
विद्यार्थीच्या मातासाठी होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमांचे आयोजन केले.रांगोळी ,लिंबू चमचा,, तळ्यात मळ्यात,संगीत खुर्ची, प्रश्न मंजुषा, उखाणे यासारख्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या.पालकांनी या कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर आपला सहभाग नोंदवला तसेच बक्षीसा ची देखील लय लूट करण्यात आली स्पर्धेच्या प्रथम क्रमांकाच्या पैठणीच्या मानकरी अश्विनी सचिन भोईटे या ठरल्या तर द्वितीय क्रमांक पूजा रेवन्नाथ बोबडे तर तृतीय क्रमांकाच्या मानकरी सारिका धनंजय साखरे या ठरल्या. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून अनिता महादेव झोळ नीता आबासाहेब झोळ आणि इंदुबाई जगन्नाथ झोळ या उपस्थित होत्या

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अभिनव प्रशालेतील सर्व शिक्षक स्टाफ तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी खूप मेहनत घेतली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक साक्षी सोनवणे आणि ऐश्वर्या साळवे यांनी केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता जाधव आणि प्रेमा चव्हाण मॅडम यांनी केले. तर कार्यक्रमासाठी परीक्षक म्हणून ज्योती चव्हाण आणि तेजस्वी झोळ यांनी ही जबाबदारी पार पाडली तसेच चालता-बोलता, प्रश्नमंजुषा संध्या महानवर यांनी घेतले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जाधव यांनी केले असून सर्व यशस्वी महिला स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
Reactions

Post a Comment

0 Comments