Hot Posts

6/recent/ticker-posts

सहकार महर्षींनी सहकारातून नवमहाराष्ट्र घडविला- प्रा.आप्पासाहेब खोत

 सहकार महर्षींनी सहकारातून नवमहाराष्ट्र घडविला- प्रा.आप्पासाहेब खोत




अकलूज (कटूसत्य वृत्त):- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर व शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील स्मृती व्याख्यानमालेचे सातवे पुष्प गुंफताना साहित्यिक आप्पासाहेब खोत सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या जीवनात साहित्य आणि वक्तृत्व यांचे स्थान या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पु.अ.हो. सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ.प्रकाश महानवर उपस्थित होते.
               प्रा.आप्पासाहेब खोत यांनी सहकार महर्षींच्या जीवन व कार्याचा आढावा घेत.सांगितले की,महाराष्ट्रामध्ये सहकार चळवळ कशी रुजली व सहकार चळवळीतून माळशिरसच्या माळरानावर हरितक्रांती व धवलक्रांती फुलविणाऱ्या सहकार महर्षींच्या विशाल दृष्टिकोनातून समृद्धीची व संपन्नतेची शिखरे पादाक्रांत करीत असताना.नवमहाराष्ट्र घडविण्याची मुहूर्तमेढ रोवल्याचे स्पष्ट केले.मातीत रमणाऱ्या माणसाची माती होऊ नये हे जाणणारे,माणसांना सहकाराच्या माध्यमातून जगण्याचा विचार देणारे व अनेक संकटांशी सामना करत लोकांच्या भविष्याचा विचार करणारे सहकार महर्षी हे  दूरदृष्टी नेते होते,असे विचार त्यांनी व्यक्त केले.
        अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना कुलगुरू महानवर म्हणाले की,सर्वसामान्य माणसांच्या उद्धारासाठी सहकाराच्या माध्यमातून उदरनिर्वाहाची अनेक साधने सहकार महर्षींनी  निर्माण केली व अनेकांचे आयुष्य उजळवून टाकले.महाराष्ट्रामध्ये सहकारातील अनेक प्रयोग हे माळशिरस तालुक्यात यशस्वीपणे राबविले व त्यातून क्रांती केली.सहकार सहकार महर्षींच्या कार्याची ओळख ही विद्यापीठातील प्रत्येक महाविद्यालयात व्याख्यानाच्या माध्यमातून पोहोचवली पाहिजे व सहकार महर्षींच्या कार्याचा महिमा या व्याख्यानमालेच्या माध्यमातून सर्वदूर पोहोचला पाहिजे.असे मत व्यक्त केले.
       या सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील स्मृती व्याख्यानमालेसाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव हर्षवर्धन खराडे-पाटील, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा.देवानंद चिलवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक विनोदकुमार दोशी,कुलसचिव डॉ.योगिनी घारे,वाणिज्य व व्यवस्थापन संकुलाचे प्रभारी संचालक डॉ.राजीवकुमार मेंते,शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक बाळासाहेब सणस,उत्कर्ष शेटे,वसंत जाधव,रामचंद्र गायकवाड,शंकरराव मोहिते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवप्रसाद टिळेकर,रसायन शास्त्र संकुलाचे संचालक डॉ. अनिल घनवट,उपकुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे,उपकुलसचिव डॉ. सूर्यकांत कांबळे,प्रशांत चोरमले, डॉ.वर्षा भोसले, सोलापूर जिल्ह्यातील साहित्यिक इंद्रजीत घुले,शिवाजी बागल,अनंत पाटील संकुलाच्या समन्वयक डॉ. वनिता सावंत,डॉ.रश्मी दातार, डॉ.इम्तियाज सय्यद,डॉ.विघ्नेश नादरगी,डॉ.जयश्री मुंडेवाडीकर, प्रा.मुग्धा जगदाळे,प्रा.वनिता सोनवणे,प्रा.सौजन्या घंटे तसेच शिक्षण प्रसारक मंडळातील शाखाप्रमुख,शिक्षक,पत्रकार, विद्यापीठातील अधिकारी वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.    
       या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.वनिता सावंत यांनी केले तर आभार डॉ.जयश्री मुंडेवाडीकर यांनी मानले.
Reactions

Post a Comment

0 Comments