Hot Posts

6/recent/ticker-posts

पद्मशाली युवक संघटनेच्यावतीने श्रीनिवास भाऊ संगा यांचे सन्मान

 पद्मशाली युवक संघटनेच्यावतीने श्रीनिवास भाऊ संगा यांचे सन्मान 

सोलापूर(कटूसत्यवृत्त):-येथील पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने राजमल बोमड्याल मंगल कार्यालयात  अखिल भारत पद्मशाली युवजन संघमच्या अध्यक्ष पदी श्रीनिवास भाऊ संगा यांची निवड झालेबद्दल  सत्कार संभारम अत्यंत उत्साही वातावरणांत पार पडले.

सदर कार्यक्रम महाराष्ट्र राज्य पद्मशाली संघमचे प्रधानसचिव  यशवंत इंदापुरे यांचे अध्यक्षतेखाली , पद्मशाली शिक्षण संस्थेचे विश्वस्त व्यंकटेश आकेन, सेवानिवृत्त संघाचे उपाध्यक्ष अनिल कन्ना, पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष शेखर कटकम प्रेसिटेंड नागेश बोमड्याल,सचिव विजय निली आदीच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

प्रथम प्रेसिडेंट नागेश बोमड्याल यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. त्यांनंतर आदरणीय श्रीनिवास भाऊ संगा यांचे पुष्पहार, मोमेंटम आणि बुके देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यांत आले.सेवानिवृत्त संघाचे उपाध्यक्ष अनिल कन्ना यांनी मार्गदर्शन पर भाषणांत श्रीनिवास भाऊ संगा यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या तर सत्कारादाखल श्रीनिवास भाऊ संगा यांनी युवक संघटनेचे आभार मानले.तसेच अखिल भारत पद्मशाली संघमचे अधिवेशन 9 मार्च 2025 रोजी हैद्राबाद येथे अधिवेशन असून युवकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले. माधवी अंदे यांनी शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय भाषणांत यशवंत इंदापुरे यांनी हैद्राबाद येथील अधिवेशनास उपस्थित राहून युवकांनी एकीचे बळ दाखवावे असे आवाहन केले. श्रीनिवास भाऊ यांना पुढील कारकिर्दिस शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमास युवक संघटनेचे माजी अध्यक्ष साईराम बिर्रू,गिरीश कोटा, राकेश पुंजाल,रविंद्र गड्डम,तुषार जक्का,सुधाकर नराल,रोहन श्रीराम, श्रीनिवास यन्नम, अमर बोडा, कपिल आकेन आदी आजी माजी पदाधिकारी तसेच युवक युवती उपस्थित होते.

युवक संघटनेचे उपाध्यक्ष अंबादास कुडक्याल, गोविंद राजूल,ऍड श्याम आडम सहसचिव अविनाश शंकू आदींनी कार्यक्रम यशस्वी होणेसाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आणि आभार व्यंकटेश आकेन मानले.

Reactions

Post a Comment

0 Comments