Hot Posts

6/recent/ticker-posts

शिवजयंती मिरवणुक परवानगीसाठी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पोलीस प्रशासनासोबत सकारात्मक बैठक

 शिवजयंती मिरवणुक परवानगीसाठी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती

 महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली 

पोलीस प्रशासनासोबत सकारात्मक बैठक

सोलापूर (कटूसत्यवृत्त):-शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने 19 तारखेला निघणाऱ्या विविध मंडळाच्या मिरवणूक संदर्भात शहर पोलीस आयुक्तालय येथे बैठक पार पडली, यावेळी नानासाहेब काळे, दिलीप कोल्हे, सुशील बंदपट्टेनरेंद्र काळे, संजय शिंदे, सुनील रसाळे, महेश हनमे, सचिन स्वामी, वैभव गंगने यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते, मिरवणूक परवानगीसाठी येणाऱ्या अडचणी संदर्भात चर्चा करण्यात आली, येणाऱ्या दोन ते तीन दिवसात मंडळांना 19 तारखेला मिरवणुकीसाठी परवानगी मिळेल, असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले, 


त्यामुळे सर्व मंडळांनी मिरवणूक परवानगी संदर्भात कोणतीही काळजी करून नये सर्व मंडळांना मिरवणुकीसाठी परवानगी मिळणार असून सर्व मंडळांनी उत्साही वातावरणात  नियमांचे पालन करून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करावी असे आवाहन शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.


Reactions

Post a Comment

0 Comments