Hot Posts

6/recent/ticker-posts

श्रद्धा इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ जल्लोषात साजरा.

 श्रद्धा इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ जल्लोषात साजरा.

मोहोळ  (कटूसत्य वृत्त):- श्रद्धा इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये दि. ११ फेब्रुवारी २०२५  रोजी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ जल्लोषात साजरा झाला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती फोटो पूजनाने झाली. या  कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी संस्थापक सचिव सुनील झाडे हे होते. तर  प्रमुख पाहुणे म्हणून प्रवीण पासले हे  मार्गदर्शक म्हणून या कार्यक्रमास लाभले.  तसेच दहावीला वर्गाला शिकवणाऱ्या शिक्षकांनी वर्षभर विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी अथक परिश्रम घेतले. तसेच संस्थेचे संस्थापक सचिव सुनील झाडे यांनी इयत्ता दहावीला शिकवणाऱ्या शिक्षकांचे कौतुक केले व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा  दिल्या. धरती पाटील व महानंदा गाडे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व पुढील परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. संस्था संचालक मोहित झाडे, प्रथमेश झाडे, व्यवस्थापक मिलन ढेपे, व्यवस्थापिका धरती पाटील,  मुख्याध्यापिका वीणा कदम, सलमान मुल्ला, विद्या पवार, समन्वयक पौर्णिमा सुरवसे, रूपाली कोकाटे, प्राजक्ता आरबळकर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववी मधील अंशूला कळसे, राजनंदिनी फाटे, रेवा देशमुख, प्रियंका माळी, प्रद्युम्न केवळे यांनी केले तर आभार कृष्णा बागल हिने मानले. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन इयत्ता नववीतील विद्यार्थ्यांनी केले असून त्याचे प्रतिनिधित्व आदित्य माळी याने केले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Reactions

Post a Comment

0 Comments