Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूरचा पारा ३८ अंशांवर: उन्हाचा चटका वाढला; यावर्षीचा उन्हाळा चिंताजनक

 सोलापूरचा पारा ३८ अंशांवर: उन्हाचा चटका वाढला; 

यावर्षीचा उन्हाळा चिंताजनक


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहर व परिसरातील तापमानाचा पारा गेल्या काही दिवसांपासून ३७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहत होता. यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक ३८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद आज झाली.

फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यातच सोलापूरच्या कमाल तापमानाचा पारा ३८ अंशांवर पोचल्याने यंदाच्या उन्हाळ्याबाबत चिंता व्यक्त होऊ लागली आहे. 

सोलापूर परिसरात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढू लागला आहे. वाढत्या उन्हामुळे वातावरणातून थंडी आणि गारवा गायब झाला आहे. सकाळी १० वाजल्यापासूनच उन्हाचा चटका जाणवण्यास सुरवात होते. दुपारच्या सुमारास उन्हाचा चटक अधिक असल्याने उन्हापासून बचाव केला जाऊ लागला आहे. उन्हाचा कडाका वाढल्यामुळे उकाडाही वाढू लागला आहे.

मकर संक्रांतीनंतर उन्हाचा कडाका हळूहळू वाढण्यास सुरवात होते. होळीनंतर उन्हाचा कडाका अधिक तीव्र होत असल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे. या वर्षी होळी १३ मार्च रोजी आहे. होळीपूर्वीच सोलापूरच्या तापमानाने ३८ अंश सेल्सिअसचा पारा गाठला आहे. उन्हाळ्यात सोलापूरच्या तापमानाचा पारा ४१ ते ४२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहत असल्याच्या आजपर्यंतच्या नोंदी आहेत. 

यावर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात पाण्याची फारशी टंचाई भासण्याची शक्यता नाही. प्रशासनाने तरी देखील ऐन वेळची परिस्थिती पाहून टंचाईच्या उपाययोजना राबविण्याची तयारी करून ठेवली आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments