संभाजी आरमारचा शाही पालखी सोहळा उत्साहात
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- संभाजी आरमारच्या वतीने शिवजयंतीनिमित्त शाही पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. याचा शुभारंभ जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते आ.देवेंद्र कोठे, भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस मनिष देशमुख,पोलिस आयुक्त एम. राजकुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, कुलगुरू डॉ. प्रकाश महारनवर, पोलिस उपायुक्त विजय कबाडे, संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे, कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे, शाही पालखी सोहळा प्रमुख प्रा.मल्लिकार्जुन परळकर, शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे उत्सव अध्यक्ष सुशील बनपट्टे, जी.एम. संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. पारंपरिक वाद्यांच्या गजरात पालखीतून छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक काढण्यात आली. पालखीत छत्रपती शिवरायांची मूर्ती आणि भगवतगीता, शिवचरित्र, शंभू चरित्र आणि भारतीय संविधा प्रत सन्मानपूर्वक ठेवण्यात आली.पारंपरिक हलगीच्या, बँजोच्या गजरात हा पालखी सोहळा मार्गस्थ झाला. यामध्ये वारकरी पथकाने जयघोष करीत टाळ मृदंगाचा गजर केला.
0 Comments