Hot Posts

6/recent/ticker-posts

मोहोळ तालुक्यात युवा जागृती मंचतर्फे संविधान कार्यशाळा

 मोहोळ तालुक्यात युवा जागृती मंचतर्फे संविधान कार्यशाळा

संविधान प्रसारक अमीर काझी यांचे मार्गदर्शन

मोहोळ तालुका (कटूसत्य वृत्त):-युवा जागृती मंच सामाजिक संस्थेच्या वतीने मोहोळ तालुक्यातील राष्ट्रमाता इंदिरा गांधी कन्या प्रश्नाला मोहोळ, आऊदोगिक प्रशिक्षण संस्था मोहोळ, सय्यद विरवडे , रयत शिक्षण संस्था अंकोली,जगदंबा विद्यालय पोखरापुर, तसेच महात्मा गांधी विद्यालय पेनुर या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये संविधान कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळांमध्ये विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाची तत्त्वे, मूलभूत हक्क व कर्तव्ये, तसेच लोकशाही व्यवस्थेचे महत्त्व याबाबत सखोल माहिती देण्यात आली.

कार्यशाळेस संविधान प्रसारक, मुंबईचे सुप्रसिद्ध वक्ते अमीर काझी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी संविधानाचा इतिहास, त्याची उद्दिष्टे आणि सध्याच्या काळातील त्याचे महत्त्व यावर सविस्तर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी संविधान हे केवळ एक पुस्तक नसून, मानवाला स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार आहे,यावर विशेष भर दिला.

कार्यशाळेच्या माध्यमातून उपस्थित विद्यार्थ्यांना संविधान काय आहे याची सविस्तर माहिती पोवाडे, कविता सादर करीत जागरूक करण्यात आले. मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये, लोकशाही व्यवस्थेची रचना, सामाजिक न्याय आणि युवकांची जबाबदारी या विषयांवर सखोल चर्चा झाली. विद्यार्थ्यांनी संविधानाविषयी असलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे, डॉ. प्रमोद पाटील ,शात्रज्ञ बापट मॅडम, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष मनोज मोरे,इंदिरा कन्या प्रश्नाला अध्यक्ष वैभव गुंड, चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष प्रवीण डोके, नगरसेविका सीमाताई पाटील, इंदिरा कन्या प्रशालेचे प्राचार्य सुधीर गायकवाड, आयटी आय चे प्राचार्य ठोकले, माझी मुख्याध्यापक श्रीधर उन्हाळे, रचना हार्डवेअर चे मोरे,युवा जागृती मंच चे संस्थापक अध्यक्ष ॲड. आकाश कापुरे, उपाध्यक्ष संजय लोंढे, सचिव हरि सरवदे, आनंद अवचारे आदी मान्यवर उपस्थित होते.


कार्यक्रमानंतर आउदोगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये मान्यवरांच्या हस्ते वृक्ष रोपण करण्यात आले व त्या वृक्षाला संविधान वृक्ष कट्टा असे नाव देण्यात आले. युवा पिढीमध्ये संविधानाबाबत जागरूकता निर्माण व्हावी आणि लोकशाही मूल्यांची जपणूक करण्याची प्रेरणा मिळावी, हा या कार्यशाळांचा उद्देश होता. युवा जागृती मंचच्या या उपक्रमाचे सामाजिक स्तरावर मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात येत आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments