केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात शेतकर्यांसाठी महत्वकांक्षी योजनांचा समावेश..
माढा (कटूसत्य वृत्त):- केंद्रीय मंत्री अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्र सरकारचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये शेतकऱ्यांच्या विविध योजनांना गती मिळवून देण्यासाठी आर्थिक तरतूद केलेली आहे.शेतकर्यांना शेतीमध्ये पतपुरवठा होण्यासाठी किसान क्रेडीट कार्डची पाच लाख रूपयांची मर्यादा वाढवल्यामुळे खेळते भांडवल होण्यास मदत होणार आहे. तसेच ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी छोट्या छोट्या उद्योग व्यवसायांमध्ये केंद्र शासनाने गुंतवणूक केलेली आहे.या अर्थसंकल्पात तेलबिया कडधान्ययुक्त भविष्यात भारत बनविण्यासाठी ठोस ऊपाययोजना करण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नती मध्ये एक दिशादर्शक अर्थसंकल्प ठरेल.
प्रा सुहास पाटील. राज्य प्रवक्ते- रयत क्रांती संघटना तथा सदस्य- ऊस दर नियंत्रण समिती, महाराष्ट्र शासन.
0 Comments