Hot Posts

6/recent/ticker-posts

मुलांनी पालकांना समजून घेतले पाहिजे : वसंत हंकारे

मुलांनी पालकांना समजून घेतले पाहिजे : वसंत हंकारे


बार्शी (कटूसत्य वृत्त):- आपल्या राज्याला माता जिजाऊ, छत्रपती शिवराय, नरवीर छत्रपती संभाजीराजे, फुले शाहू आंबेडकर यांचा वैचारिक आणि कृतिशील वारसा लाभला आहे. मुलांनी
शिक्षण घेताना हा वारसा सुध्दा समजून घेतला पाहिजे. आपण शिक्षण घेताना संस्कारही
जपले पाहिजेत. आपल्या मातापित्यांनी किती काबाडकष्ट करून आपल्याला वाढवली
आहे याबाबत आपल्या मनामध्ये कृतज्ञता असली पाहिजे. त्यांनी आपल्या पालकांना समजून
घेतले पाहिजे, असे प्रतिपादन वक्ते वसंत हंकारे यांनी केले.श्री शिवाजी शिक्षण प्रसारक
मंडळाचे संस्थापक कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे यांच्या १२२ व्या जयंतीनिमित्त आयोजित बाप समजून घेताना या विषयावर हंकारे बोलत होते. यावेळी त्यांनी पालक आणि मुलांच्या नात्यावर मा. अरुण (दादा) बार व्याख्यानमाला विचार व्यक्त करताना हंकारे भावनिक प्रकाश टाकत उपस्थित मुला-मुलींना अंतर्मुख केले अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिवशक्ती नागरी सहकारी बँकेचे चेअरमन डॉ.प्रकाश बुरगुटे व यशोदा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण बारबोले उपस्थित होते.हंकारे म्हणाले, शिक्षण घेताना मुलांनी आपल्या ध्येयापासून विचलित होता कामा नये. बदलत्या काळामध्ये अनेक मोह प्रलोभणे वाढली आहेत. शाळा महाविद्यालयांमध्ये जाण्याचा मूळ उद्देश हरवत चालला आहे. त्यामुळे मुला- मुलींना मातापित्याबद्दलच्या कर्तव्याची जाणीव करून दिली पाहिजे. पालकांचे अंतकरण वरून दगडासारखे घट्ट दिसत असले तरी त्यांच्या मनामधला जिव्हाळा हा अपरंपार असतो.
हंकारे यांचे विचार ऐकून अनेक मुली गहिवरून रडल्या. तर उपस्थित पालकांनाही अश्रू
आनावर झाले.कर्मवीरांच्या जयंतीनिमित्त पालक आणि आपत्यांमध्ये सुसंवाद निर्माण करत नात्यांमधला आदर वाढविणाऱ्या या व्याख्यानाला बार्शीकरांनी दाद दिली. यावेळी संस्थेचे सचिव प्रकाश पाटील,खजिनदार जयकुमार शितोळे,सहसचिव अरुण देबडवार,प्राध्यापक किरण गाढवे, प्राचार्य डॉक्टर अब्दुल शेख, व अनेक मान्यवर उपस्थित होते.


Reactions

Post a Comment

0 Comments