Hot Posts

6/recent/ticker-posts

नेताजी मराठी प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळावा

नेताजी मराठी प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळावा

 सोलापूर(कटूसत्य वृत्त):-नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस मराठी प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न झाला .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष अण्णाराव कुंभार होते .प्रमुख अतिथी शेळगी केंद्राचे केंद्रप्रमुख विकास पाटील यांच्या हस्ते आनंद मेळाव्याचे उदघाटन करण्यात आले.यावेळी नेताजी हायस्कूलचे मुख्याध्यापक रविशंकर कुंभार, राजराजेश्वरी मराठी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली कुंभार, राजराजेश्वरी हायस्कूलचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर म्हेत्रे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक विजयकुमार हुल्ले, माता पालक संघाच्या सदस्या कल्पना झिपटे, मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार उपस्थित होते.क्रांतीज्योती  सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजनानंतर विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. मेळाव्यात कब बुलबुल पथकाने तयार केलेल्या खाऊचे झाड आकर्षक दिसत होते.रिया बारड या पहिलीच्या मुलीने माझ्या अंगणात हे गीत सादर करुन उपस्थिताकडून वाहवा मिळवली. बुलबुल पथकाने पाहुण्यांना बडी सलामी दिली. यावेळी  केंद्रप्रमुख विकास पाटील म्हणाले, पालकांनी विद्यार्थ्यांच्या अशा लहान- सहान उपक्रमाला प्रेरणा देत रहावे. यातूनच मुले आत्तापासूनच विविध कौशल्य शिकतात. कृपया पालकांनी विद्यार्थ्यांचे आनंद हिरावून घेऊ नये असे आवाहन केले.संस्था अध्यक्ष अण्णाराव कुंभार म्हणाले, विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी नेताजी प्राथमिक शाळेत वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येतात.या परिसरातील सर्व पालक नेहमी सहकार्य करतात. पालक आणि शिक्षकांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदेव गवसने यांनी केले तर राजशेखर पाटील यांनी आभार मानले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी वृंदानी परिश्रम घेतले.

Reactions

Post a Comment

0 Comments