Hot Posts

6/recent/ticker-posts

लक्ष्मी टाकळीत ग्रामसभेमध्ये हात उंचावून दारूबंदीे करण्याचा ठराव मंजुर

 लक्ष्मी टाकळीत ग्रामसभेमध्ये हात उंचावून 

दारूबंदीे करण्याचा ठराव मंजुर




पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- लक्ष्मी टाकळी गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या नागरिकांची, वैधरितीने दारूबंदी करण्यासाठी लक्ष्मी टाकळी येथे आज हात उंचावून  दारू दुकाने बंदी करण्याचा ठराव करण्यात आला.गावातील दारूबंदीसाठी ग्रामस्थांनी अनेकवेळा मोठे प्रयत्न केले. गावातील दारू दुकान बंद करण्यासाठी ग्रामसभा घेण्यात आली या ग्रामसभेत विषय वैधरित्या व अवैध दारू विक्री बंदी करण्याबाबत पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळीत अवैध दारू विक्री बंद सह दारुविक्रीवर बंदी करण्याचा हात उंचावून शासनमान्य दारू दुकाने बंद करण्याचा ठराव घेण्यात आला यावेळी लक्ष्मी टाकळी गावातील व पंढरपूर लगत असलेल्या उपनगरातील ९० टक्क्यांहून अधिक महिलांनी आडवी बाटली करण्यासाठी कौल दिला आहे.लक्ष्मी टाकळीचे सरपंच संजय साठे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेला शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख महेश साठे, उपसरपंच रूपाली कारंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास ढोणे, तंटामुक्त अध्यक्ष संभाजी कदम, शेतकरी प्रतिनिधी सुरेश टिकोरे, विद्या विकास प्रतिष्ठानचे विलास देठे, पोलीस पाटील इरकल मॅडम, मोटिवेशन स्पीकर नंदकुमार दुपडे, ग्रामपंचायत सदस्य औदुंबर ढोणे, समाधान देठे, गोवर्धन देठे, आशाबाई देवकते, उद्योगपती आबासाहेब पवार, माजी सरपंच सचिन वाळके, नंदकुमार वाघमारे व विजयमाला वाळके, माजी उपसरपंच सागर सोनवणे, अनिल सोनवणे, महादेव पवार, तसेच ग्रामविकास अधिकारी जयंत खंडागळे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments