Hot Posts

6/recent/ticker-posts

जिल्हा विज्ञान प्रज्ञा परीक्षेत एस.एन.डी.स्कूलची मृणाल मोरे द्वितीय

 जिल्हा विज्ञान प्रज्ञा परीक्षेत एस.एन.डी.स्कूलची मृणाल मोरे द्वितीय

नातेपुते (कटूसत्य वृत्त):-सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ आयोजित विज्ञान प्रज्ञा, परीक्षेत नातेपुते येथील एसएनडी इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल मधील विद्यार्थिनी मृणाल महेशकुमार मोरे हिने इयत्ता नववीच्या गटामधून द्वितीय क्रमांक मिळविला. त्याबद्दल तिचा सोलापूर येथे शास्त्रज्ञ डॉक्टर व्यंकटेश गंभीर व महाराष्ट्र विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मीप्रसाद मोहिते यांच्या शुभहस्ते मृणाल मोरे हिचा प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला. विज्ञान प्राविण्य परीक्षेस १२ हजार विद्यार्थी बसले होते. तर सोलापूर जिल्ह्यातून १२० विद्यार्थी बसले होते. त्यातील २ हजार विद्यार्थी पात्र झाले असून यामध्ये मृणाल मोरे हिने दुसरा क्रमांक मिळवला त्याबद्दल एस एन डी इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष व सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, स्कूलचे चेअरमन मालोजीराजे देशमुख, तसेच संचालक मंडळ, मुख्याध्यापक संदीप पानसरे, उपमुख्याध्यापक शकूर पटेल, पीआरओ मनोज राऊत तसेच स्कूल मधील शिक्षक यांनी अभिनंदन केले.
Reactions

Post a Comment

0 Comments