विलासराव घुमरे यांच्या वाढदिवसानिमित्त यशवंत युवा महोत्सवांतर्गत विविध स्पर्धा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, February 3, 2025

विलासराव घुमरे यांच्या वाढदिवसानिमित्त यशवंत युवा महोत्सवांतर्गत विविध स्पर्धा

 विलासराव घुमरे यांच्या वाढदिवसानिमित्त यशवंत युवा महोत्सवांतर्गत विविध स्पर्धा




 करमाळा (कटूसत्य वृत्त):- विद्या येथील विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे विद्या विकास मंडळाचे सचिव, यशवंत परिवाराचे आधारस्तंभ विलासराव घुमरे विलासराव घुमरे यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालयामध्ये यशवंत युवा महोत्सवचे आयोजन केले आहे.
त्याअंतर्गत विविध स्पर्धा होणार आहेत.विद्यार्थ्यासाठी 'मिस मॅच डे', संगीत खुर्ची, रांगोळी स्पर्धा व लिंबू चमचा आदींचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ३ फेब्रुवारी रोजी रॅम्प वॉक, मिस वाय. सी. एम. व शेलापागोट्याचा कार्यक्रम होणार आहे. दि. ४ फेब्रुवारी रोजी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सकाळी १० वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि.५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता रक्तदान शिबिर होणार आहे. तर दि. ६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता यशवंत परिवाराच्या वतीने मार्गदर्शक विलासराव घुमरे यांचा सन्मान सोहळा होणार असून त्यानंतर महाराष्ट्रातील ख्यातनाम व सुप्रसिद्ध वक्ते गणेश शिंदे यांचे 'भविष्यावर बोलू काही' या विषयावर व्याख्यान होणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages