Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर जिल्ह्यातील ११ तालुक्यात राष्ट्रवादी कॉग्रेसची सभासद नोंदणी मोहीम : अक्षय भांड

 सोलापूर जिल्ह्यातील ११ तालुक्यात राष्ट्रवादी कॉग्रेसची 

सभासद नोंदणी मोहीम : अक्षय भांड


नातेपुते(कटूसत्यवृत्त):-विधानसभा व लोकसभेच्या मोठ्या अपयशानंतर सोलापुरात जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची विसकटलेली घडी  व झालेली दुरवस्था हे चित्र बदलण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांची फळी निर्माण करण्यासाठी सोलापूर जिल्ह्याकडे लक्ष केंद्रित केले असुन सोलापूर जिल्ह्यातील ११ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस चे जाळे निर्माण करून नवीन चेहऱ्यांना पक्ष संघटनेत संधी देऊन येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये मुसंडी मारण्याचा आमचा निर्धार असलयाचे मत जिल्हा कार्याध्यक्ष अक्षय भांड यांनी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले. तसेच ते पुढे बोलत असताना म्हणाले की,महाराष्ट्र प्रदेश पातळीवर सभासद नोंदणीचा कार्यक्रम जाहीर झाला असून मोठ्या संख्येने सभासद करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून पुढील आठवड्यात युवक प्रदेश अध्यक्ष सुरज चव्हाण हे सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार असून त्यामध्ये सभासद नोंदणीचा शुभारंभ मोठ्या प्रमाणात होणार असल्याची माहिती सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस चे कार्याध्यक्ष अक्षय भांडं यांनी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पत्रकार परिषदेसाठी जिल्हा सरचिटणीस रियाज शेख, तालुका युवक अध्यक्ष अमित देशमुख व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments