Hot Posts

6/recent/ticker-posts

विठ्ठलवाडीच्या समृद्धी गुंड हिचा वक्तृत्व स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक

विठ्ठलवाडीच्या समृद्धी गुंड हिचा वक्तृत्व स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक 



माढा (कटूसत्य वृत्त):- रोपळे खुर्द ता.माढा येथील (कै.)सुदाम नारायण साळुंके स्मृती वाचनालयाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत विठ्ठलवाडी येथील समृद्धी सुधीर गुंड हिने लहान गटात प्रथम क्रमांक पटकाविला असून तिला प्रथम क्रमांकाचे रोख बक्षीस 2 हजार रुपये, स्मृतिचिन्ह,प्रमाणपत्र व ग्रंथ पंढरपूरच्या प्रा.वंदना कुलकर्णी व इतर मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.

या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन पंचायत समितीचे सभापती विक्रमसिंह शिंदे यांच्या हस्ते व जिल्हा दूध संघाचे संचालक शंभूराजे मोरे, गटशिक्षणाधिकारी विकास यादव,केंद्रप्रमुख दिगंबर काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते.या स्पर्धेत जिल्ह्यातील 50 स्पर्धकांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता.समृद्धी गुंड हिने "सोन्याची उशी आणि आईची कुशी" या विषयावर अत्यंत उत्कृष्ट व प्रभावी पद्धतीने भाषण सादर केले होते.समृद्धी गुंड सध्या माढा येथील सीबीएसई बोर्डाच्या आर्या पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता सहावीत शिकत आहे.या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून भारत डुचाळ, सुहास चवरे,गोरखनाथ शेगर व माधुरी वागज यांनी पारदर्शक पद्धतीने कामकाज पाहिले.ती विठ्ठलवाडीचे सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड यांची नात,विठ्ठलराव शिंदे प्राथमिक पतसंस्थेचे संचालक सुधीर गुंड व सहशिक्षिका माधुरी गुंड यांची कन्या आणि आदर्श शिक्षक तथा पत्रकार राजेंद्र गुंड यांची पुतणी आहे.

यावेळी दादासाहेब काळे,रितेश पाटील,संताजी पाटील,श्रीकांत काशीद,सुधीर गुंड,दिनेश लोंढे, अरुण साळुंखे,सहदेव साळुंखे, वैभव साळुंखे,सुरेश पाटील,राम साळुंखे,राहुल डोईफोडे, सिद्धेश्वर पवार यांच्यासह पालक,शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments