बार्शी (कटूसत्य वृत्त):- प्रजासत्ताक दिनानिमित्त भगवंत मैदान येथे पार पडलेल्या मुख्य ध्वजारोहण समारंभात बार्शीतील जनसेवा हायस्कूलच्या मुलींच्या झांज पाथकाने प्रथम क्रमांक पटकवला आहे यावेळी तहसीलदार एफ आर शेख यांच्या हस्ते यांच्या हस्ते गौरव करण्यात आला यावेळी नगरपालिका मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण, पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे, शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारी अनिल बनसोडे, महिला व बालकल्याण अधिकारी रेश्मा पठाण, आगार प्रमुख मधुरा जाधवर, आदीसह विविध विभागाचे खातेप्रमुख तसेच विविध शाळेचे शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.या विद्यार्थ्यांना जनसेवा हायस्कूलच्या मुख्याध्यापिका शिला शिंदे, संस्थेच्या संचालिका कांचन गुंड,व अजय राऊत यांचे मार्गदर्शन लाभले.
तहसीलदार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर विविध शाळेचे विद्यार्थी, पोलीस, होमगार्ड, एनसीसी, अग्निशमन दल, आरोग्य पथक, इत्यादीनी उत्कृष्ट संचलन केले.
0 Comments