यंदाचा ऊस हंगाम लवकरच आटोपणार
वाशिंबे (कटूसत्य वृत्त):- परिसरातील उजनी बॅकवॉटरचा ऊस सिझन हा अंतिम टप्प्यात आला आहे.गतवर्षी दुष्काळाच्या तीव्र झळा व उजनी धरणाची झालेली स्थिती शेतकऱ्यांना पिकांना पाणी वेळेवर न मिळाल्याने एकरी टनेजचा तोटा सहन करावा लागला.तर एकीकडे या भागातील युवा शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून फळे शेतीकडे वळला गेला आहे. त्यामुळे ऊस शेतीचे क्षेत्र कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे.केळीसारख्या पिकाला मोठ्या प्रमाणात प्रधान्य दिले जात आहे. ऊसाची शेती कमी झाल्याने यंदाचा ऊस सिझन लवकर आटोपणार आहे.पश्चिम भागात ऊसाचा फड नसल्याने काही लेबर बाहेरगावी उस तोडणी करण्यासाठी जावे लागत आहे. पंधरा दिवसानी तोडणीसाठी ऊसाचे शेज नसणार आहे .सिझन लवकर संपल्याने टनेज कमी होणार आहे. दोन महिने अगोदर सिझन संपत असल्याने ऊस तोडणी कामगारांना दिलेली उचल न फिटल्याने टोळी मालकांना दुहेरी आर्थिक फटका बसणार आहे.
0 Comments