फडणवीस आणि त्यांचे सरकार नागरिकांना का घाबरतय?
मुंबई (कटूसत्य वृत्त):-राज्याचे आणि सरकार नामक यंत्रणेचे प्रशासकीय मुख्यालय असलेल्या मंत्रालयात सध्या जनतेच्या वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर भाजपाप्रणित महायुतीचे सरकार स्थानापन्न झालेल्या सरकारने एक नवा निर्णय घेतला आहे. स्थानिक पातळीवर काम होत नसल्याने मंत्रालयाची वाट धरलेल्या नागरिकांना आता त्याच्या पासचे आणि चेहऱ्याचे फेसियल रिडींग द्यावे लागणार असल्याने राज्यातल्या नागरिकांना, पत्रकारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सरकार प्रत्येकाची माहिती जमा करतय म्हणजे इतकं का घाबरतं अशी चर्चा मंत्रालयाबरोबरच सर्वसामान्य जनतेमध्ये सुरु झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना त्यांच्या शपथविधीच्या स्थळी एक बॅनर लावण्यात आला होता. त्या बॅनरवर महाराष्ट्र आता बदलणार असे वाक्य त्या बॅनरवर लिहिले होते. त्यावेळी महाराष्ट्र बदलणार म्हणजे नेमकं काय होणार असा प्रश्न त्यावेळी काही जणांकडून उपस्थित करण्यात आला होता. मात्र भाजपा आणि शिवसेना शिंदेच्या पक्षाकडून विकासाच्या वाटेवर चालणार असल्याचे सांगत महाराष्ट्र बदलण्याच्या प्रक्रियेला समर्थन दिले होते. परंतु राज्याचे प्रशासकीय आणि सरकारचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयात सर्वसामान्य नागरिक आणि पत्रकारांना येण्यापासून अप्रत्यक्ष जाचक अटींच्या नियमांखाली प्रवेशालाच बंदी घालण्याचा प्रकार मंत्रालयात सुरु झाला आहे की काय असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.
0 Comments