ज्याच्या शेतात वाळूसाठा, त्याच्यावर होणार कारवाई; जिल्हाधिकारी आशीर्वाद यांचे आदेश - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, February 27, 2025

ज्याच्या शेतात वाळूसाठा, त्याच्यावर होणार कारवाई; जिल्हाधिकारी आशीर्वाद यांचे आदेश

 ज्याच्या शेतात वाळूसाठा, त्याच्यावर होणार कारवाई; 

जिल्हाधिकारी आशीर्वाद यांचे आदेश

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यातील वाळू स्थळांचा लिलाव झालेला नाही. अनेक ठिकाणी अनधिकृत वाळू उपसा, वाळू साठा व वाळू वाहतूक होत असल्याची माहिती आमच्याकडे आली आहे. वाळूसाठा ज्या जागेत आहे, त्या जागा मालकांवर आता कारवाई केली जाणार आहे.

त्या दृष्टीने जिल्ह्यातील तहसीलदारांना पाहणी करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. 

जिल्ह्यातील अनाधिकृत वाळूसोबतच आम्ही दगड व मुरुम या गौण खनिजावरही विशेष लक्ष देणार असल्याचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले. सोलापूर जिल्ह्यात सध्या २५ अधिकृत दगड खाणपट्टे आहेत. या शिवाय चालणारे दगड खाणपट्टे, खडी क्रेशर हे अनाधिकृत आहेत. अनाधिकृत खडी क्रेशर व दगड खाणपट्टे यांच्यावर कारवाई करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. 

जिल्ह्यातील त्या त्या तहसीलदारांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात असलेले वाळू साठे, दगड खाणपट्टे, खडी क्रेशर यांची माहिती पाठवावी, ही माहिती संकलित करण्यासाठी तहसीलदारांनी एक पथक तयार करून पाहणी करावी व अहवाल सादर करावा, अशा सूचना दिल्या असल्याचेही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले.

पालकमंत्र्यांनी अनाधिकृत वाळू उपसा संदर्भात कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर जिल्ह्यात पोलिस व महसूल प्रशासनाने कारवाई केली आहे. कारवाई सुरू झाल्याने अनाधिकृत वाळू उपसा, वाळू वाहतूक याचे प्रमाण कमी झाले आहे. येत्या काळात जिल्ह्यातील गौण खनिजाबाबत कठोर व पारदर्शक उपाययोजना केल्या जाणार आहेत. गौण खनिजासाठी नवीन प्रणाली कार्यान्वित करण्याचेही आम्ही नियोजन केले असल्याचे आशीर्वाद यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages