Hot Posts

6/recent/ticker-posts

उजनी जलपर्यटन केंद्रासाठी बोट खरेदीची निविदा रद्द

 उजनी जलपर्यटन केंद्रासाठी बोट खरेदीची निविदा रद्द   


सोलापूर (कटूसत्य वृत्त):-  राज्य शासनाने पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी नवा अजेंडा तयार केला आहे. मात्र, या केवळ घोषणाच ठरत आहेत. सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरणाच्या जलाशय व काही परिसरातील काही जमिनीवर कृष्णा खोरे विकास महामंडळाने करारासाठी हक्क सांगितल्याने उजनी जलपर्यटन केंद्रासाठी बोट खरेदीची निविदा रद्द झाली आहे.   त्यामुळे उजनी पर्यटन विकासाला ब्रेक लागला आहे.

सोलापूर जिल्ह्याला आणून स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करणे हा एक शासनाचा प्रयत्न आहे. यासाठी जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीचा लाभ घेऊन जल, कृषी, धार्मिक व विनयार्ड पर्यटनाच्या अनुषंगाने विविध सोयी-सुविधा निर्माण करण्यासाठी प्रशासनाकडून सुमारे 250 कोटींचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा तयार करण्यात आला आहे.

उजनी धरणात जलपर्यटन, 94 धार्मिक स्थळे असल्याने धार्मिक पर्यटन, कृषी क्षेत्रात अग्रेसर असल्याने कृषी पर्यटन तसेच विनयार्ड पर्यटन विकसित होण्यासाठी पायाभूत सोयी-सुविधा निर्माण केल्यास जिल्ह्याचा पर्यटनाच्या दृष्टीने सर्वांगिण विकास होईल. शिवाय स्थानिक लोकांनाही रोजगार मिळेल व त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. उजनी धरण निसर्गरम्य आणि पक्षी निरीक्षणासाठी प्रसिद्ध आहे. येथे दरवर्षी हजारो मैदावरून विदेशी पक्षी येतात. येथे अक्वॉटिक टुरिझम तसेच वॉटर स्पोर्ट टुरिझम मोठ्या प्रमाणावर विकसित होऊ शकते.

Reactions

Post a Comment

0 Comments