विजयवाडी येथे विविध विकास कामांचे उद्घाटन संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, January 21, 2025

विजयवाडी येथे विविध विकास कामांचे उद्घाटन संपन्न

विजयवाडी येथे विविध विकास कामांचे उद्घाटन संपन्न


अकलूज (कटूसत्य वृत्त):- माळशिरस तालुक्यातील मौजे विजयवाडी येथील ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या विविध विकास कामांचे उद्घाटन व रस्त्यांचे भूमिपूजन, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील,आ.रणजितसिंह मोहिते-पाटील,आ.उत्तमराव जानकर,माळशिरस पंचायत समितीचे उपसभापती अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
          या विकास कामामध्ये सकट वस्ती येथील सभामंडप आठ लाख रुपये कामाचे भूमिपूजन,लावंड वस्ती येथील सभा मंडप आठ लाख रुपये, भंडारे वस्ती ते सकट वस्ती रस्ता बावीस लाख रुपये,जलजीवन मिशन योजना ८२ लाख रुपये कामाचे लोकार्पण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील,आ.रणजितसिंह मोहिते पाटील,आमदार उत्तमराव जानकर  यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
         यावेळी माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील,माजी सभापती मच्छिंद्र ठवरे, माजी जिल्हा परिषद सदस्या सुनंदाताई फुले,सहकार महर्षी साखर कारखान्याचे संचालक भीमराव काळे,शंकरराव मोहिते पाटील सूतगिरणीचे चेअरमन सुभेदार काळे, केपी काळे,पांडुरंग वाघमोडे,  बाळासाहेब तरसे,माजी सरपंच बाळासाहेब काळे,उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग माळशिरसच्या सौ.टी.एन.हुन्नुरे,वैद्यकीय अधिकारी डॉ.ए. बी.आव्हाड,गटनेते आप्पा इंगळे, सरपंच उमेश भंडारी, उपसरपंच रवींद्र इंगळे,माजी उपसरपंच शंकर वाघमोडे,पोलीस पाटील अनिल लावंड, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब इंगळे,प्रल्हाद लावंड, ग्रामसेविकास मनिषा साठे विजयवाडी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages