Hot Posts

6/recent/ticker-posts

शिवतीर्थ पुरस्काराचे सोमवारी वितरण

 शिवतीर्थ पुरस्काराचे सोमवारी वितरण




अँड. माने, सुरवसे, ठोकळ, पाटील, खरे मानकरी

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- येथील मराठा समाज सेवा मंडळाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या शिवतीर्थ पुरस्काराचे वितरण व तिळगुळ समारंभ येत्या सोमवारी 13 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी ठीक 5:00 वाजता छत्रपती शिवाजी प्रशालेत होणार आहे. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष तथा  माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या अध्यक्षतेखाली व माजी केंद्रीय गृहमंत्री  सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते पार पडणार आहे. याप्रसंगी ह. भ. प. प्रकाश बोधले महाराज हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत
यावेळी कै. अँड. एकनाथ तुळशीराम माने व कै. अंबादास दाजीबा सुरवसे (मुकादम) यांना मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार तर माजी आमदार निर्मलाताई शंकरराव ठोकळ, माढ्याचे आमदार अभिजीत धनंजय पाटील, मोहोळचे आमदार राजू ज्ञानू खरे यांना शिवतीर्थ समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
या कार्यक्रमास समाज बांधव व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान संस्थेचे जनरल सेक्रेटरी प्रा. महेश माने व सांस्कृतिक कमिटी चेअरमन ज्ञानेश्वर सपाटे यांनी केले आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments