रस्त्यावर उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रकला भरधाव
कारची पाठीमागून धडक
जालना (कटूसत्य वृत्त):- धुळे-सोलापूर महामार्गावर जालना जिल्ह्यातल्या महाकाळा फाट्यावर आज दुपारी रस्त्यावर उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रकला भरधाव कार पाठीमागून धडकून झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू झाला, तर दोघेजण गंभीर जखमी झाले. अनिता परसराम कुटे (वय ४८), भागवंत यशवंत चौरे (वय ४७), श्रृष्टी भागवंत चौरे (वय १३) वेधनंम भागवंत चौरे (वय ११ ) अशी मृतांची नाव आहे. या अपघातात परसराम लक्ष्मण कुटे आणि छाया भागवंत चौरे हे दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर इथल्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातगस्त भाविकांची ही कार अक्कलकोट इथून देवदर्शन करून छत्रपती संभाजीनगरकडे परत येत असतानाच ही दुर्घटना घडली. घटनास्थळी स्थानिक नागरिकांसह गोंदी पोलिसांनी मदतकार्य केलं. नववर्षाच्या पहिल्या दिवशी ही दुर्घटना घडल्यानं हळहळ व्यक्त होत आहे. अपघातातील मृत आणि जखमी सर्वजण छत्रपती संभाजीनगर इथले रहिवासी आहेत.
0 Comments