संभाजी ब्रिगेडच्या वतीने आसरा पुल रुंदीकरणसाठी बोंबाबोंब आंदोलन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जुळे सोलापूरला जोडणारा आसरा रेल्वे पूल रुंदीकरण गेल्या अनेक वर्षांपासून रखडल्याने महानगरपालिका प्रशासन महारेल प्रशासन आमदार खासदार यांच्या निषेधार्थ आसरा पुलावर संभाजी ब्रिगेडच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम यांच्या नेतृत्वाखाली बोंबाबोंब आंदोलन करून निषेध करण्यात आला.
होटगी रोड आणि विजापूर रोड ला जोडणारा महत्त्वचा आसरा पुल अरुंद असल्याकारणाने वेळोवेळी वर्दळी मुळे ट्राफिक जामचा प्रश्न उद्भवत होता तसेच या पुलावर अपघात होऊन चार जणांचा बळी सुद्धा गेला होता जुळे सोलापूर भागात अनेक नवीन नागरी वसाहती व लोकसंख्या कित्येक पटीने वाढल्यामुळे या आसरा पुलाचे रुंदीकरण होणे अत्यंत गरजेचे होते तसेच होडगी रोड ते विजापूर रोड हा रस्ता मॉडल रस्ता होणे अत्यंत गरजेचे आहे तरच या भागातील वर्ग व वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे आसरा पुलाच्या रुंदीकरणासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने वेळोवेळी निवेदने व आंदोलन केलं होते केंद्रीय वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांच्या प्रयत्नाने 2023 मध्ये आसरा पुलरुंदीकरणाच्या कामाला मंजुरी मिळून सुमारे 35 कोटीचा निधी सुद्धा प्राप्त झाला होता महारेल च्या वतीने जुलै 2023 मध्ये पुलाच्या कामाला सुरुवात करण्याचे फलक ही लावण्यात आले होते पण पुलाखालील जलवाहिनी स्थलांतरित केल्याशिवाय पुलाचे काम करता येणार नाही जलवाहिनी स्थलांतर करण्यास सुमारे दहा-बारा कोटी ची गरज असून महानगरपालिका व महारेल यांच्या टोलवाटोलवीमुळे आसरा पूल रुंदीकरणाचे काम गेल्या दोन वर्षापासून रखडलेले आहे सोलापुरातील खासदार आमदारांच्या दुर्लक्षामुळे आसरा पूल रुंदीकरणाच्या कामाला मंजुरी मिळून देखील दोन वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे आणखी कुण्या नागरिकाच्या बळी गेल्यावर हे काम सुरू होणार आहे का? त्यामुळे प्रशासनाला व लोकप्रतिनिधींना जाग आणण्यासाठी संभाजी ब्रिगेड व नागरिकांच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र दिन शाम कदम जिल्हा अध्यक्ष संभाजी राजे भोसले शहराध्यक्ष शिरीष जगदाळे महिला शहराध्यक्ष मोनाली धुमाळ कार्याध्यक्ष अरविंद शेळके संपर्कप्रमुख छत्रगुण माने शहर उपाध्यक्ष माधुरी चव्हाण शहर उपाध्यक्ष मनीषा कोळी राजनंदनी धुमाळ दक्षिण तालुका अध्यक्ष शेखर चौगुले शहर उपप्रमुख सिताराम बाबर शहर उपाध्यक्ष फिरोज सय्यद विराज कुरेशी शब्बीर शेख तोशिफ नदाफ सय्यद पटेल रमेश जमादार सुरेश पाटील आलोक काळे प्रवीण शिरणार विठ्ठल भोसले सचिन देशमुख संतोष जगती धर्मराज जगती रमेश भंडारे मल्लिकार्जुन शेवगार गौरीशंकर वरपे विश्वनाथ अमाने बाळासाहेब शिंद शिवराज वारे काझी हैदर महेश गुब्याद आदि उपस्थित होते.
चौकट - खासदार प्रणिती शिंदे आमदार सुभाष देशमुख यांनी महानगरपालिका आयुक्त महारेल चे व्यवस्थापक जिल्हाधिकारी रस्ते विकास महामंडळ तसेच संबंधित ठेकेदार यांची संयुक्त बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावणे अत्यंत गरजेचे आहे तसेच आसरा चौक ते विजापूर रोड हा दोन पदरी मॉडल रस्ता होणे अत्यंत गरजेचे आहे.
शाम कदम
पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संभाजी ब्रिगेड
0 Comments