Hot Posts

6/recent/ticker-posts

लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत भारतातील स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा सागर महाजन व प्रमुख पाहुणे प्रा. वर्षा मानेदेशमुख लाभल्या होत्या.  कार्यक्रमाची सुरुवात क्रांतज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. या कार्यक्रमाची प्रस्तावना महाविद्यालयाची विद्यार्थीनी नक्षत्रा हीने सादर केली. महाविद्यालयाचे विद्यार्थी धम्मेश गवळी, प्रसाद नेटके, मंजुनाथ कुंभार, तृप्ती जाधवर आदींनी आपल्या मनोगतातून महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचा जीवनप्रवास, कार्य तसेच स्त्रीशिक्षणक्षेत्रातील त्यांचे योगदान याविषयी मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयाच्या प्रा. वर्षा मानेदेशमुख यांनी विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचे महत्त्व पटवून सांगताना सांगितले की सावित्रीबाई फुले यांनी खूप खडतर परिस्थितीत स्वतःचे शिक्षण पूर्ण करून समाजातील इतर स्त्रियांना शिकवले व यासाठी  महात्मा ज्योतिबा फुले यांची मोलाची साथ त्यांना लाभली. सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणक्षेत्रातील योगदानामुळे आज स्त्रीया उच्चशिक्षण घेत असून विविध क्षेत्रात यशस्वीपणे उच्चपदांवर कार्यरत आहेत. आजच्या पिढीने त्यांचे योगदान स्मरण करून समाजातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी पयत्न करावे असे मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास प्रा. आशिष सरकाळे, प्रा. सायली बडेकर, प्रा. वर्षा मानेदेशमुख तसेच महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.  या कार्यक्रमाचे समन्वयन महाविद्यालयाच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी नक्षत्रा कांबळे व आभारप्रदर्शन विद्यार्थी अमित जाधव यांनी व्यक्त केले.


Reactions

Post a Comment

0 Comments