Hot Posts

6/recent/ticker-posts

नातेपुते येथील रत्नत्रय प्री स्कूल मध्ये हळदी कुंकू व खाऊ गल्लीचा कार्यक्रम

 नातेपुते येथील रत्नत्रय प्री स्कूल  मध्ये हळदी कुंकू व खाऊ गल्लीचा कार्यक्रम



नातेपुते (कटूसत्य वृत्त):-
रत्नत्रय एज्युकेशन सोसायटी संचलित रत्नत्रय प्री स्कूलच्या वतीने नातेपुते शहरातील महिलांसाठी हळदी कुंकू व खाऊ गल्ली चा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. सदर कार्यक्रमास नगराध्यक्षा  अनिता लांडगे, नगरसेविका स्वाती बावकर, शर्मिलाताई चांगण तसेच रत्नत्रय एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष  अनंतलाल दोशी, मृणालिनी दोशी, संस्थेचे चेअरमन प्रमोद दोशी, पूनम दोशी, सोनाली  दोशी, श्रुती दोशी, स्कूलचे सभापती  वैभव शहा प्रीतम दोशी यशराज दोशी, स्वदेश दोशी,  रोनक चंकेश्वरा, अमृतलाल गांधी, अमित शहा, विनय दोभाडा, डॉ. विशाल दोशी, तुषार देसाई सभापती  वैभव शहा प्रीतम दोशी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन व लावण्यात आलेल्या खाऊ गल्लीच्या स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले. नातेपुते शहरातील अनेक महिला मंडळींनी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमास उपस्थित राहून खाऊ गल्लीचा आस्वाद घेतला. खाऊ गल्लीचे एकूण २२ स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलमध्ये पाणीपुरी पासून भाजी भाकरी पर्यंत वेगवेगळे पदार्थ ठेवण्यात आले होते. स्कूलच्या शिक्षिका सविता देसाई, पूजा दोशी, प्रीती कुलकर्णी,  सरिता पवार व मदतनीस अवघडे या सर्वानी सर्व महिलांचे स्वागत हळदी कुंकू लावुन व तिळगुळ वाटप करुण केले. हळदी कुंकाच्या कार्यक्रमात फनी गेम घेण्यात आल्या असून विजेत्या महिलांना बक्षीस देण्यात आले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिलावर्ग उपस्थित राहिला होता हळदी कुंकू वास उपस्थित राहिलेल्या सर्व महिलांचे रत्नत्रय - प्री स्कूलच्या मुख्याध्यापिका माधवी रणदिवे यांनी आभार मानले.
Reactions

Post a Comment

0 Comments