वाघाला पकडण्यासाठी येडशीत सापळा
येडशी (कटूसत्य वृत्त):- वाघाला पकडणारे ताडोबा अभयारण्यातील तज्ज्ञांचे पथक सोमवारी बार्शीत दाखल झाले. मंगळवारी या पथकाने येडशी येथील रामलिंग अभयारण्य व आसपासच्या परिसरात वाघ ज्याठिकाणी आढळून आला त्या ठिकाणांची पाहणी केली.
वाघाच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी वनविभागाने रामलिंग अभयारण्यासह आणखी तीन ते चार विविध ठिकाणी कॅमेरे लावले आहेत. वाघाला बेशुद्ध करून पकडण्याचे नियोजन या पथकाकडून करण्यात आले आहे.
मंगळवारी सकाळी १० वाजता तज्ञांच्या पथकाने रामलिंग अभयारण्य व ढेंबरेवाडी वनपरिक्षेत्रात वाघाचा वावर असलेल्या तलाव परिसरासह विविध ठिकाणी पाहणी केली. या पथकाने वाघाचा वावर असलेल्या मार्गावर मिळणारे खाद्य, पाणी पिण्याचे ठिकाण, त्याचे वास्तव्य याची पाहणी व अभ्यास सुरू केला आहे.
तज्ज्ञांच्या मोहिमेने दिलासा मिळाला असून वाघ सुरक्षितपणे जेरबंद होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. वन विभागाने या मोहिमेला प्राधान्य देत नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
तीन जिल्ह्यांच्या परिसरात पाहणी
ताडोबा येथील तज्ज्ञ पथकाने डोंगराळ भागातील तब्बल १० ते १२ किलोमीटर परिसराची पाहणी करून माहिती घेतली. यावेळी त्यांच्यासोबत सोलापूर, धाराशिव, लातूर, उदगीर, भूम, आणि बार्शी येथील वनअधिकारी, कर्मचारी, प्राणीमित्र आदी मदतीसाठी उपस्थित होते.

0 Comments