Hot Posts

6/recent/ticker-posts

सुरज देशमुख यांची युवक जिल्हाध्यक्षपदी निवड

 सुरज देशमुख यांची युवक जिल्हाध्यक्षपदी निवड


प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान 
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- टेंभुर्णी येथील युवक नेतृत्व सुरज देशमुख यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाच्या युवक जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. यशवंतराव चव्हाण सेंटर,मुंबई येथे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील,आमदार अभिजीत पाटील व युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या निवडीचे पत्र देण्यात आले.
सुरज देशमुख यांनी मागील दोन वर्षांपासून आपले सामाजिक व राजकीय काम उभारले आहे. महिला,युवकांचे विविध सामाजिक उपक्रम त्यांनी राबवले आहेत. या कामाची दखल अनेक राज्यस्तरीय माध्यमांनी घेतली होती. त्यांनी टेंभुर्णी सारखी जिल्ह्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत निवडणुकीत आपला स्वतःचा पॅनल उभा करीत घवघवीत यश मिळावले होते. तसेच नुकतीच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आ.अभिजीत आबा पाटील यांना टेंभुर्णी परिसरातून मोठ्या प्रमाणात मताधिक्य देण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. त्यांचे देशमुख कुटुंब हे पुरोगामी विचाराधारा जपणारे आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या परिवाराशी त्यांचे स्नेहाचे संबध आहेत.
   विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ देशाचे नेते शरदचंद्र पवार हे टेंभुर्णी येथे प्रचारसभेसाठी आले असता देशमुख यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट देऊन स्नेहभोजन केले होते. त्यामुळे पक्ष लवकरच त्यांच्या मोठी जबाबदार देणार यांची चर्चा जिल्हाभरात होती.
   या निवडीबद्दल रावसाहेब देशमुख म्हणाले की,सुरज देशमुख यांनी मागील दोन वर्षात माढा तालुक्यात मोठ्या प्रमाणात सामाजिक काम उभे केले आहे. त्यांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांनी स्वत उपस्थित राहून पक्षासाठी आता सक्रिय राहावा असा संदेश दिला होता.ते भविष्य काळात नक्कीच जिल्हाभरात आपले चांगले संघटन उभा करुन आदरणीय पवार साहेबांचे विचार शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवतील असा विश्वास असल्याचे मत रावसाहेब देशमुख यांनी व्यक्त केले.निवडीचा आनंद फटाके वाजवून नाना-भैय्या युवा मंचाच्या वतीने टेंभुर्णी येथे करण्यात आला. याप्रसंगी गोरख देशमुख,सोमनाथ कदम,गणेश केचे, ग्रामपंचायत सदस्य वैभव महाडिक,शैलेश ओहोळ,अप्पासाहेब हवलदार,बिभीषण देशमुख,दिलीप केचे,हरिबा देशमुख,प्रताप देशमुख,गजेंद्र देशमुख,गणेशअप्पा देशमुख,दादासाहेब,सिध्देश्वर देशमुख,प्रशांत देशमुख,शुभम देशमुख,गणेश सरवदे,शारंग गायकवाड,विजय खरात,गणेश खरात,रत्नदिप अटकळे,अक्षय कांबळे,सुजल कांबळे,मयुर मुसळे,नितीन महाडिक,सागर महाडिक,बिटू केचे,अजय ओहोळ उपस्थित होते...!

चौकट-
आदरणीय देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब यांनी देशासाठी,महाराष्ट्रासाठी केलेले काम,सामाजिक एकता जपण्याचे केलेले काम,सर्वधर्मसमभाव,त्यांचे विचार आणि पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचवण्याची संधी मला पदाच्या माध्यमातून मिळत आहे. आज पक्ष सत्तेत नसला तरी या पदाच्या माध्यमातून जिल्ह्याभरातील युवकांचे चांगले संघटन उभा करुन पक्ष मजबूत करण्याचा मी प्रमाणिक प्रयत्न करणार आहे. लवकरच प्रत्येक तालुक्यामध्ये मुलाखती घेऊन कार्यकारणी जाहीर करण्यात येईल. घराघरापर्यंत पक्षाचे विचार पोहोचवण्यासाठी गाव तेथे शाखा हा उपक्रम आम्ही लवकरच राबवित आहोत. देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब,राज्याचे उपमुख्यमंत्री तथा आमचे मार्गदर्शक विजयसिंह मोहिते-पाटील,प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब,खासदार धैर्यशील मोहिते-पाटील,आमदार अभिजीत पाटील,युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी या पदावरती काम करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार. आपण प्रमाणिकपणे काम करुन या पदाला योग्य न्याय देणार आहोत-सुरज देशमुख,नुतन जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार)

Reactions

Post a Comment

0 Comments