Hot Posts

6/recent/ticker-posts

एस. व्ही. सी. एस. प्रशालेचे चित्रकला परीक्षेत यश

 एस. व्ही. सी. एस. प्रशालेचे चित्रकला परीक्षेत यश 


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- एस. व्ही. सी .एस. हायस्कूल एमआयडीसी येथील शासकीय रेखा कला एलिमेंटरी ग्रेड चित्रकला परीक्षेचा निकाल १००  टक्के तर इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेचा निकाल ९२टक्के लागला. एलिमेंटरी ग्रेड परीक्षेत सर्वच्या सर्व ५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून १०  विद्यार्थी अ श्रेणीत १५  विद्यार्थी ब श्रेणीत व 26 विद्यार्थी क श्रेणीत उत्तीर्ण झाले. इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेचं ३६  विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामध्ये अ श्रेणीत ५, ब श्रेणीत १३ विद्यार्थी व क श्रेणीत १८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या विद्यार्थ्यांना कलाशिक्षक पंडित स्वामी यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे प्रशालेचे मुख्याध्यापक संगप्पा म्हमाणे ,उपमुख्याध्यापक धनंजय नकाते व पर्यवेक्षक संतोष कुमार तारके यांनी अभिनंदन केले

Reactions

Post a Comment

0 Comments