राष्ट्रमाता- राजमाता जिजाऊ मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने जिजाऊ जयंती साजरी
५२ रक्तदात्यांनी रक्तदान करून केले अभिवादन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- स्वराज्य जननी जिजाऊ मांसाहेब यांच्या 474 व्या जयंतीनिमित्त शहरातील पार्क चौक येथे राजमाता - राष्ट्रमाता जिजाऊ मध्ये मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने व छत्रपती ग्रुपच्या वतीने उत्साहात जयंती साजरी करण्यात आली.
५२ रक्तदात्यांनी रक्तदान करून मासाहेब जिजाऊंना अभिवादन केले. शनिवारी सायंकाळी फौजदार चावडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात आली होती. तर रविवारी सायंकाळी राजमाता जिजाऊ पतसंस्थेच्या चेअरमन आशाताई शिंदे यांच्या हस्ते व संचालक मंडळांच्या उपस्थिती पूजन करण्यात आले.
यावेळी राज्यस्तरीय महिला कबड्डी खेळामध्ये ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी मध्ये सहभाग घेतलेली अनुराधा अचलारी, 100 मीटर धावणे राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवलेली पूजा राठोड ,तलवारबाजीत राष्ट्रीय राष्ट्रीय ड्रायव्हिंग स्पर्धेत सहभाग नोंदवली आभा उज्वल मालजी, इंटरनॅशनल खेळाडू श्रावणी सूर्यवंशी ड्रायव्हिंग खेळाडू. आदींचा सत्कार यावेळी छत्रपती ग्रुपच्या वतीने करण्यात आला.
यावेळी संस्थापक अध्यक्ष मनोज शिंदे, उत्सव अध्यक्ष अजयकुमार सिंह ,शितल टेकाळे, गजेंद्र जाधव ,सागर शिंदे, अक्षय जाधव, किशोर मोरे ,सिद्धू कटारे, विकी सूर्यवंशी, मधुकर कद,म योगेश मोरे यश मोरे, उदय मोरे, भीमाशंकर टेकाळे अनिल गायकवाड ,शिवाजी कोल्हे, अनिल इंगळे, तायाप्पा चव्हाण ,संजय जाधव , कृष्णा पवार, प्रशांत पवार आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
0 Comments