बोगस ग्रामसभा दाखवून परमिट
रुमला ना हरकत प्रमाणपत्र
मोहोळ तालुक्यातील येणकी ग्रामपंचायतचा अजब कारभार
सोलापूर(कटुसत्य वृत्त):-
मोहोळ तालुक्यातील येणकी ग्रामपंचायत बोगस ग्रामसभा दाखवून परमिट रुमसाठी बोगस ना हरकत प्रमाणपत्र दिल्याच्या तक्रारीवर जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडे प्राप्त झाली होती. याप्रकरणी शुक्रवार, १७ जानेवारी २०२५ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्यासमोर सुनावणी झाली. या प्रकरणाचा अहवाल विभागीय आयुक्त यांच्याकडे अंतिम निर्णयासाठी पाठविण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी दिली.
मोहोळ तालुक्यातील येणकी ग्रामपंचायतीत बोगस ग्रामसभा दाखवून ग्रामसेवक व सरपंच यांनी संगनमताने बार व परमिट रूमला ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. याप्रकरणी संबंधित ग्रामसेवकाचे निलंबन करून सरपंचाला अपात्र ठरवावे, संबंधित बिअर बार व परमिट रुमची परवानगी रद्द करण्यात यावी, अशी मागणी जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख व आकाश खरात यांनी केली होती. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या अहवालावर विभागीय आयुक्त कोणती भूमिका घेणार? याकडे संपूर्ण मोहोळ तालुक्याचे लक्ष लागले आहेत.
0 Comments