भुताष्टेच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत चिमुकल्यांचा कलाविष्कार
सुंदर व आकर्षक नृत्याने जिंकली उपस्थितांची मने
माढा (कटूसत्य वृत्त):- माढा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भुताष्टे या ठिकाणच्या वार्षिक स्नेहसंमेलन व विविध गुणदर्शनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात चिमुकल्यांनी सादर केलेल्या सुंदर व आकर्षक नृत्य व गीतांनी उपस्थितांची मने जिंकत वाहवा व शाबासकी मिळवली.
या सदाबहार कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच मंदाकिनी सुरेश यादव यांच्या हस्ते करण्यात आले.सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट पद्धतीने मराठी,हिंदी गाणी व समूह नृत्य सादर केले.छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा, विद्यार्थ्यांची वेशभूषा अत्यंत उत्कृष्ट व आकर्षक होती. विद्यार्थ्यांच्या कलेला ग्रामस्थ, पालक व महिलांनी उत्कृष्ट पद्धतीने दाद देत मनापासून कौतुक व अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक श्रीनिवास मोहिते सहशिक्षिका माधुरी वागज-गुंड,सत्यवान सरवदे यांचे उत्कृष्ट मार्गदर्शन लाभले.
यावेळी सरपंच मंदाकिनी यादव,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उमेश यादव, तंटामुक्तीचे अध्यक्ष सुधीर यादव,विठ्ठलराव शिंदे प्राथमिक पतसंस्थेचे संचालक सुधीर गुंड, पोलीस पाटील विशाल यादव, शाळा व्यवस्थापनचे माजी अध्यक्ष बळीराम यादव,माजी सरपंच दिलीप यादव,अरणच्या मुख्याध्यापिका शांता वाघमोडे, कल्पना घाडगे,गोरख राऊत यांच्यासह ग्रामस्थ,पालक, युवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments