खा. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली उजनी प्रकल्पग्रस्त व गावठाण संदर्भात चर्चा
अकलूज (कटूसत्य वृत्त):- पंढरपूर तालुक्यातील उजनी प्रकल्पग्रस्त व गावठाण पुनर्वसनासंदर्भातील प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
या बैठकीत उजनी धरण प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या गावांच्या पुनर्वसनासंदर्भातील समस्या, पुनर्वसन योजनेतील अडथळे, व नवीन पुनर्वसन धोरणांची अंमलबजावणी या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. याचबरोबर गावठाणांतील पायाभूत सुविधा, आणि आर्थिक मदतीचे विषय मांडण्यात आले.
खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न तत्काळ सोडवण्यासाठी प्रशासनाला ठोस पावले उचलण्याचे निर्देश दिले. त्यांनी सांगितले की, प्रकल्पामुळे प्रभावित झालेल्या लोकांच्या हक्कांसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.पुनर्वसनासंदर्भातील संबंधित सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील.
या बैठकीस आ.अभिजीत पाटील, समाधान आवताडे,आ.राजू खरे,प्रांत अधिकारी सचिन इथापे,उपमुख्यअधिकारी जि.प शेळकंदे,सुनिल वाळुंजकर,पोलीस उपाधिक्षक अर्जुन भोसले,भूमिलेख उपाधिक्षक अवताडे,गटविकास अधिकारी संसारे,विविध शासकीय अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, व प्रकल्पग्रस्त नागरिक उपस्थित होते.
उपस्थितांनी आपल्या समस्या व मागण्या मांडल्या ही बैठक प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहण्यासाठी ठी महत्त्वपूर्ण ठरली आहे.
0 Comments