जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती (दिशा) ची बैठक
खासदर प्रणिती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न
सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- केंद शासनाच्या विविध योजनांचा सविस्तर आढावा जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीच्या बैठकीत खासदार प्रणिती शिंदे यांनी घेऊन सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून जिल्ह्यातील प्रत्येक पात्र लाभार्थ्यांपर्यंत केंद्रीय योजनांचे लाभ पोहचेल याची दक्षता घेण्याची सूचना त्यांनी दिल्या.
नियोजन भवन समितीच्या सभागृहात आयोजित जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती (दिशा) च्या बैठकीस खासदार धैर्यशील मोहिते पाटील, खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, आमदार सर्वश्री अभिजीत पाटील, नारायण पाटील, डॉ. बाबासाहेब देशमुख, राजू खरे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मनपा आयुक्त शितल उगले तेली, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोपीचंद कदम, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा चे प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधकारी महसूल अमृत नाटेकर यांच्या सह सर्व संबंधित शासकीय विभाग प्रमुख उपस्थित होते.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यात जास्तीत जास्त कामे सेल्फ वर ठेवून ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करावा. तसेच पाणंद रस्त्याची मंजूर असलेली 1 हजार 146 कामापैकी 66 कामे सुरू आहे तर उर्वरित कामे त्वरित सुरू करावीत. राष्ट्रीय ग्रामीण जीवन ज्योती अभियान अंतर्गत मोठ्या प्रमाणावर महिला बचत गटाची स्थापना करून त्यांना बँकांकडून कर्ज पुरवठा करण्याच्या दृष्टीने योग्य नियोजन करावे. जिल्ह्यात सन 2024-25 मध्ये लखपती दीदींची संख्या 98 हजार इतकी असून ही संख्या मोठ्या प्रमाणावर कशा पद्धतीने वाढेल यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना समिती अध्यक्ष खासदार प्रणिती शिंदे यांनी दिल्या.
पाणंद रस्त्याची कामे सुरू करताना एक किलोमीटर रस्त्यासाठी वीस लाख रुपयांचा स्लॅब आहे. त्यावरती अंदाजपत्रक गेल्यास पानंद रस्त्याच्या कामांना मंजुरी मिळत नाही. तरी केंद्र शासनाच्या माध्यमातून एक किलोमीटर रस्त्यासाठी 20 लाखाची मर्यादा काढून टाकल्यास ही कामे मोठ्या प्रमाणावर करता येऊ शकतात अशी माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली. सद्यस्थितीत सर्व तालुक्यात किमान 200 कामे पानंद रस्त्याची सुरू होऊ शकतात परंतु ते सर्व रस्ते कच्चे घ्यावे लागतील. तहसीलदार यांच्याकडे रस्ते बाबत प्रलंबित केसेस चा निकाल लावण्या बाबतची कार्यवाही लवकरच करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात महिला बचत गटाची संख्या मोठ्या प्रमाणावर असून या बचत गटांच्या महिलांना तालुका स्तरावर नियोजन समितीच्या निधीतून महिला भवन निर्माण करून विसावा सुविधा उपलब्ध करण्यात येईल. तसेच तालुक्यातील इतर मोठ्या गावातही सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येतील अशी माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली. महिला बचत गटांना 320 कोटीचा कर्ज पुरवठा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेले होते, ते आज रोजी पर्यंत 333 कोटी कर्ज वाटप बचत गटांना झालेले आहे असेही त्यांनी सांगितले. त्याप्रमाणेच प्रधानमंत्री ग्राम सडक योजना याची स्वतंत्र बैठक घेऊन घेण्यात आलेल्या कामाची सविस्तर माहिती संबंधित खासदार व आमदार महोदयांना उपलब्ध करून देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, महापालिका आयुक्त शितल उगले तेली व स्मार्ट सिटी चे कार्यकारी अधिकारी गोपीचंद कदम यांनी बैठकीत अनुक्रमे ग्रामीण व शहरी भागातील विषयानुसार माहिती सांगितली.
यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील, धाराशिव चे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, आमदार अभिजीत पाटील, आमदार बाबासाहेब देशमुख, आमदार नारायण पाटील आणि आमदार राजू खरे यांनी रोजगार हमी योजना, महिला बचत गट, महिला भवन निर्माण करणे, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, सोलापूर शहर भुयारी गटार योजना, पायाभूत सुविधा व विकास, आरोग्य योजना अशा अनेक केंद्रीय योजनेच्या अनुषंगाने संबंधित यंत्रणेला माहिती विचारून तसेच या अंतर्गत प्रलंबित असलेली कामे तसेच अनेक ठिकाणी कामात होत असलेल्या दिरांगाईच्या अनुषंगाने सूचना करून ही सर्व कामे वेळेत मार्गी लावण्याबाबत आवाहन करण्यात आले.
प्रारंभी केंद्र शासनाच्या योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी आपापल्या विभागांतर्गत सुरू असलेल्या योजनांची माहिती व सद्यस्थिती बैठकीत सादर केली.
केंद्रीय योजना आढावा -
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना,दिन दयाळ अंत्योदय योजना / राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान, दिन दयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, दिनदयाळ अंत्योदय योजना शहरी, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, राष्ट्रीय सामाजिक साहय कार्यक्रम, स्वच्छ भारत मिशन ग्रामीण (SBM-G), राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम (NRWDP), केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियान सोलापूर पाणीपुरवठा शहर, केंद्र शासन पुरस्कृत सोलापूर शहर भूयारी गटार योजना, अमृत ड्रेनेज, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (PMKSY), एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम (IWMP), भूमी अभिलेखाचे संगणकीकरण (NRLMP), सोलापूर स्मार्ट सिटी, P.M. स्व निधी, दिन दयाळ उपाध्याय ग्रामीण ज्योती योजना (DDU-GJY), प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, प्रधानमंत्री आवास योजना शहरी, प्रधानमंत्री कृषी विमा योजना, राष्टीय आरोग्य अभियान ग्रामीण, राष्ट्रीय आरोग्य अभियान शहरी, सर्व शिक्षा अभियान ग्रामीण, सर्व शिक्षा अभियान शिक्षण मंडळ शहर, समग्र शिक्षा / माध्यान्ह भोजन योजन शिक्षण मंडळ शहर, एकात्मिक बाल विकास योजना ग्रामीण, प्रधानमंत्री उज्वला योजना, Digital India Public Internet Access Programme- Providing Service Centre on each Grampanchayat, पायाभूत विकास कार्यक्रम महामार्ग, टेलीकॉम, रेल्वे इ., सांसद आदर्श ग्राम योजना आणि रे नगर फेडरेशन तर्फे सोलापूर येथे प्रधानमंत्री आवास योजना शहरी, या प्रकारे खासदार प्रणिती शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील दिशा समितीने केंद्रीय योजनांचा सविस्तर आढावा घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे यांनी दिशा समितीच्या आजच्या बैठकीच्या विषयाची माहिती दिली तसेच बैठकीच्या शेवटी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
0 Comments